मराठी बातम्या /बातम्या /देश /BREAKING : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक, 2 जणांना मिळाली पाकमध्ये ट्रेनिंग!

BREAKING : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक, 2 जणांना मिळाली पाकमध्ये ट्रेनिंग!

6 terrorists arrested in Delhi : या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोघा जणांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देण्यात आली आहे,

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असताना दिल्लीमध्ये (delhi) मोठी खळबळजनक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांच्या (delhi police special seal) स्पेशल सेलने 6 जणांना अटक केली आहे. यातील दोन जण हे पाकिस्तानी (Pakistan  terrorists) प्रशिक्षित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. (6 terrorists arrested in Delhi)

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्यासह प्रयागराज इथं छापा टाकला. यावेळी सहा जणांना अटक केली आहे. प्रयागराजमधील करेली या भागात हे सहा जण लपून बसले होते.

रोहित पवारांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट, दिले हे आश्वासन

या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोघा जणांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देण्यात आली आहे, दोघेही प्रशिक्षित आहे. या सर्वांना कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त केली आहे.

IPL मधून अखेरच्या क्षणी माघार, इंग्लंडच्या खेळाडूने सांगितलं खरं कारण

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

First published:
top videos