BREAKING : माओवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे केले अपहरण, सुरक्षा दलात खळबळ

BREAKING : माओवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे केले अपहरण, सुरक्षा दलात खळबळ

जगदलपूरला नियुक्तीवर असलेले मुरली ताती हे सुट्टीवर बिजापूर जिल्ह्यात गंगलुरला आपल्या गावी आले होते.

  • Share this:

छत्तीसगड, 21 एप्रिल : छत्तीसगडमधील(Chhattisgarh) बिजापूर (Bijapur- Sukma Border) जिल्ह्यात माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे.  माओवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बिजापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरिक्षक मुरली ताती असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. जगदलपूरला नियुक्तीवर असलेले मुरली ताती हे

सुट्टीवर बिजापूर जिल्ह्यात गंगलुरला आपल्या गावी आले होते.

पालनारच्या आठवडी बाजारात खरेदी करण्यासाठी गेले असता बाजारातून माओवाद्यानी पोलीस उपनिरीक्षकांचे अपहरण केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  अलीकडेच 3 एप्रिल रोजी माओवाद्यांनी जवानाचे अपहरण करुन नाटयमय पद्धतीने सुटका केली होती. त्या घटनेनंतर आज उपनिरीक्षकांचे अपहरण केल्याने सुरक्षा दलात खळबळ उडाली आहे.

एकीकडे ऑक्सिजनअभावी जातोय रुग्णांचा जीव; ही व्यक्ती मात्र ठरतेय मोठा आधार

बिजापूरमध्ये माओवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची माओवाद्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली होती. 7 एप्रिल रोजी राकेश्वर सिंह मनहास यांचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो माओवाद्यांनी जारी केला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा केला होता. (maoist attack in Chhattisgarh)

कोरोना संकटात तरुण नेत्यांची कौतुकास्पद कामगिरी, कोरोना योद्धा बनत रुग्णांची मदत

कोब्रा जवान राकेश्वर मनहार 6 दिवसांनंतंर माओवाद्याच्या तावडीतून सुटले होते. सरकारने गठण केलेल्या दोन सदस्यीय मध्यस्ती टीमचे सदस्य पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैयासह शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत माओवाद्यांनी जवानाची सुटका केली होती.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 9:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या