नवी दिल्ली, 16 डिसेंबर : नवीन कृषि कायद्याविरोधात (New Farm Laws) सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत (Farmer Protest) मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली-हरियाणा बॉर्डर (सिंघू बार्डर) वर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा राम सिंह यांना जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सांगितले जात आहे की संत बाबा रामसिंग हरियाणामधील करनाल येथे राहणारे होते. ट्विटर वापरकर्त्यांनी बाबांनी लिहिलेली सुसाइड नोटही पोस्ट केली आहे. असा दावा केला जात आहे की या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीचा आणि शेतकर्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याविषयी उल्लेख केला आहे.
दरम्यान नवीन कृषी कायद्यांविरोधात (New Farm Laws) सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान सरकारने देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Farmer) मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meet) असा निर्णय घेण्यात आला की ऊस उत्पादक शेतख्यांना 3500 कोटींची निर्यात सबसिडी (Subsidy), 18 हजार कोटींच्या निर्यात लाभासह दुसरी सबसिडी देखील देण्यात येईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी अशी माहिती दिली आहे की, यावर्षी सरकारने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरील सबसिडी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर (DBT) केली जाईल