Home /News /national /

BREAKING : भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री!

BREAKING : भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री!

भाजपच्या विधिमंडळ  बैठकीत भुपेंद्र सिंह पटेल यांच्या नावावर एकमत झाले.

भाजपच्या विधिमंडळ बैठकीत भुपेंद्र सिंह पटेल यांच्या नावावर एकमत झाले.

भाजपच्या विधिमंडळ बैठकीत भुपेंद्र सिंह पटेल यांच्या नावावर एकमत झाले.

    गांधीनगर, 12 सप्टेंबर : गुजरातच्या सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांच्या (Bhupendra Patel New CM of Gujarat) नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपच्या विधिमंडळ  बैठकीत भुपेंद्र सिंह पटेल यांच्या नावावर एकमत झाले. भूपेंद्र सिंह पटेल हे गुजरातच्या घाटलोदिया मतदारसंघातून आमदार आहे. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया मतदासंघातून 2017 ची निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत वासुदेवभाई पटेल यांचा पराभव केला होता. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याआधी शनिवारी अचानक गुजरातच्या राजकारणात भूकंप आला. विजय रुपाणी (Vijay Rupani Resigns) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खो-खो खेळाडूची निर्घृण हत्या; अखेरपर्यंत केला संघर्ष, मात्र नराधमांनी साधला डाव गुजरातमध्ये 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत आणि असं मानलं जात की भाजपला विजय रुपाणींवर दाव लावायचा नाही. कोरोना काळात गुजरात सरकारचे अपयश हे देखील राजीनाम्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या (Gujarat New CM) खुर्चीवर कोण बसणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजप (BJP) रविवारी (आज) विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकी भूपेंद्र सिंह पटेल यांच्यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया, गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि लक्षद्वीप लेफ्टनंट राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल यांची नावं चर्चेत होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या