'ती महिला नेहमी भय्यूच्या बेडरुममध्ये असायची', भय्यू महाराजांच्या आईचा गौप्यस्फोट

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करण्याचा एका तरुणीवर आरोप असताना आता भय्यू महाराज यांच्या आईने धक्कादायक खुलास केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2019 07:41 PM IST

'ती महिला नेहमी भय्यूच्या बेडरुममध्ये असायची', भय्यू महाराजांच्या आईचा गौप्यस्फोट

इंदूर, 01 जानेवारी : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करण्याचा एका तरुणीवर आरोप असताना आता भय्यू महाराज यांच्या आईने धक्कादायक खुलास केला आहे. 'ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू ती घरात राज्य करायला लागली. ती नेहमी भय्यूच्या बेडरुममध्ये असायची' असा खुलासा भय्यू महाराज्यांच्या 75 वर्षीय आईने म्हणजेच कुमुदनी देशमुखने केला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'ती युवती भय्यूसोबतच असायची. भय्यूच्या कपाटात तिचे कपडे ठेवायची. तिथेच अंघोळ करायची. विनायक आणि शेखरसुद्धा तिला शामिल होते. सगळ्यांनी षड्यंत्र रचून भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलं' असं त्या म्हणाल्या.

भय्यू महाराज्यांच्या मृत्यूला 6 महिने उलटल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या आईने माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या आरोपानंतर आता पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली आहे.

दरम्यान, गेल्या काही भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या त्या तरुणीचा व्हिडिओ समोर आला होता. भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करणाचा एका तरुणीवर आरोप त्यांच्या ड्रायव्हर कैलास पाटीलने केला होता. त्याच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर ती तरुणी पोलिसांसमोर आली होती. रविवारी या तरूणीची पोलिसांनी चौकशी केली. त्या तरूणीने जी माहिती दिली, त्यामुळे या प्रकरणातलं गुढ वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

Loading...

पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी 12 जून 2018 ला आपल्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.त्यानंतर भय्यूजींचा सेवादार पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं.


आजारी असतानाही मनोहर पर्रिकर सचिवालयात दाखल, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...