हावडा, 2 मे : निवडणुकीसाठी तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या बेस कँपवर गोळीबाराचं वृत्त येत आहे. या गोळीबारात एक जवान मृत्युमुखी पडला असून 2 जखमी झाले आहेत.
कोलकत्यापासून जवळ असलेल्या हावडा जिल्ह्यात बगनान इथे ज्योतिर्मय गर्ल्स स्कूलमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचा तात्पुरता तळ उभारण्यात आला होता. तिथे निमलष्करी दलातले जवान आधीपासूनच तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणाने एका जवानांच्या गटाकडून गोळीबार करण्यात आला. यात ASI भोलानाथ दास यांचा मृत्यू झाला.
लक्ष्मीकांत बर्मन या जवानाला या गोळीबार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही बातमी अपडेट होत आहे.