मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING : काँग्रेसला आणखी एक धक्का; वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा यांचं निधन

BREAKING : काँग्रेसला आणखी एक धक्का; वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा यांचं निधन

कालच मोतीलाल वोरा यांचा वाढदिवस होता. आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली

कालच मोतीलाल वोरा यांचा वाढदिवस होता. आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली

कालच मोतीलाल वोरा यांचा वाढदिवस होता. आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा (Motilal Vora) यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचानक तब्येत बिघडल्याने मोतीलाल वोरा यांना काल रात्री एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 93 व्या वर्षी मोतीलाल वोरा यांनी शेवटचा श्वास घेतला. कालचं त्याचा वाढदिवस होता. अधिक काळातपर्यंत काँग्रेसचे कोषाध्यक्ष असलेले मोतीलाल वोरा हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री (Madhya Pradesh CM) आणि उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते.

मोतीलाल वोरा यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल (25 नोव्हेंबर) यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतर निधन झालं होतं. त्यातून काँग्रेस सावरत असताना काँग्रेस पक्षावर आणखी एक आघात बसला आहे. वोरा यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या देशपातळीवरील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
First published:

Tags: Congress, Madhya pradesh

पुढील बातम्या