Hydroxychloroquine: 'मोदी म्हणजे जणू हनुमान त्यांनी...', ब्राझीलच्या पंतप्रधानांकडून स्तुतीसुमने

Hydroxychloroquine: 'मोदी म्हणजे जणू हनुमान त्यांनी...', ब्राझीलच्या पंतप्रधानांकडून स्तुतीसुमने

हनुमान जयंतीचे औचित्य साधत ब्राझीलच्या पंतप्रधानांनी मोदी हनुमान असून, त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली आहे, असे म्हणत कौतुक केले.

  • Share this:

ब्राझीलिया, 08 एप्रिल : साऱ्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्यापही ठोस उपाय सापडलेला नाही आहे. मात्र मलेरियासाठी वापरे जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध सध्या गेमचेंजर ठरत आहे. भारताकडे या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, इतर देशांकडून याची मागणी वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने हे औषध निर्यात केल्यानंतर मोदींचं कौतुक केलं होतं. आता ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हुनमान जयंतीचे औचित्य साधत मोदी हनुमान असून, त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली आहे, असे वर्णन केले आहे.

ब्राझीलचे पंतप्रधान जैअर बोल्सनारो यांनी मोदींचे पत्राद्वारे कौतुक केले आहे. त्यांनी, "संजीवनी बूटी आणून हनुमानजींनी भगवान रामाचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे भारताने दिलेली औषधी लोकांचे जीवन वाचवेल", असे सांगितले. तसेच, भारत आणि ब्राझील एकत्र या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असतील. कोरोना संसर्गाच्या उपचारात फायदेशीर असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला अमेरिकेसह जगभरातून मागणी आहे.

वाचा-24 तासांत ट्रम्प यांनी बदलला सूर, आधी दिली धमकी आता मोदींचं कौतुक

वाचा-कोरोनाच्या एका रुग्णानं संपूर्ण देशाला भरली धडकी, तब्बल 3 कोटी लोकं क्वारंटाइन

अमेरिकेने 29 लाख हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन केले खरेदी

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने तब्बल 180 देशांत वेगाने पसरत आहे. अमेरिका, इटली, स्पेन सारख्या विकसनशील देशांनीही या विषाणूचा बळी घेतला आहे. मदतीच्या आशेने अमेरिकेचे डोळे आता भारताकडे लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलून कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्याची मागणी केली होती. अमेरिकेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून 29 लाख डोस हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन खरेदी केले आहेत. सुरुवातीला भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती पण आता त्याला पुन्हा अटींसह परवानगी देण्यात आली आहे.

वाचा-लॉकडाऊनबाबत 12 एप्रिलला मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

भारताने औषधांच्या पुरवठ्यास मान्यता दिली आहे

भारताने 14 औषधांच्या निर्यातीवरील बंदी हटवली. पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध परवाना श्रेणीमध्येच आहेत. मात्र त्यांच्या मागणीवर सतत नजर ठेवले जाईल. परंतु मागणीनुसार पुरवठा होत असल्यास काही प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले की, कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी भारताने नेहमीच असे म्हटले आहे की अशा कठीण परिस्थितीत संपूर्ण जगाला एकत्र लढावे लागेल. तसेच माणुसकीबाबत देखील विचार करावा लागेल. या रोगाचा सर्वाधिक त्रास असलेल्या गरजू देशांना ही औषधे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन-प्रियांका गावडे

First published: April 8, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या