सुखोईला जोडून ब्रह्मोसची चाचणी यशस्वी

ब्रम्होस सुपरसॅनिक क्रुझ मिसाईलची आज यशस्वी चाचणी झालीये. सुखोई-30 MKI या फाईटर विमानाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडून त्याची चाचणी झाली. अशी चाचणी याआधी कधीही झाली नाही.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 03:36 PM IST

सुखोईला जोडून ब्रह्मोसची चाचणी यशस्वी

22 नोव्हेंबर : ब्रह्मोस सुपरसॅनिक क्रुझ मिसाईलची आज यशस्वी चाचणी झालीये. सुखोई-30 MKI या फाईटर विमानाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडून त्याची चाचणी झाली. अशी चाचणी याआधी कधीही झाली नाही. आतापर्यंत ब्रह्मोस फक्त जमीन किंवा समुद्रातूनच प्रक्षेपित करण्यात आलं होतं. ८ ते ९ किलोमीटर इतक्या उंचीवरून ते प्रक्षेपित केलं गेलं.

बंगालच्या उपसागरात एक जुनं जहाज आणलं गेलं. ते या चाचणीत टार्गेट म्हणून वापरलं. २ सुखोई विमानं यासाठी सज्ज ठेवली होती. एकातून प्रक्षेपण केलं गेलं, एक स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. याचा फायदा असा की याची क्षमता हजार किलोमीटर असल्यामुळे टार्गेटच्या जवळ जाण्याची गरज नाही. शत्रूचे बंकर असो, किंवा जमिनीखालचं कंट्रोल सेंटर. चेन्नईच्या हवाई तळावरून उड्डाण केलेल्या सुखोई लढाऊ विमानाला कराचीवर हल्ला करण्याची क्षमता यानं लाभेल.

तसंच, सर्जिकल स्ट्राईकसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. टार्गेटचा अचूक नेम घेणं हे ब्राह्मोसचं वैशिष्ट्य. कारण यात अत्याधुनिक नेव्हिगेशन यंत्रणा लावण्यात आलीये. गेली अनेक वर्षं याची तयारी सुरू होती. ब्रह्मोस एरोस्पेस, भारतीय वायूदल आणि एचएएल यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडली.

पाहूयात याची वैशिष्ट्य काय आहेत ते?

-  आतापर्यंत जमीन किंवा समुद्रातूनच प्रक्षेपण

Loading...

-  क्षमता  290 किमी

-  हवेतून प्रक्षेपित केल्यावर क्षमता  1000 किमी

-  सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून प्रक्षेपण

-  विमानाला क्षेपणास्त्र जोडण्याचं काम एचएएलकडे​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...