सवलतींचा वर्षाव : बेरोजगार ब्राह्मण तरुणांना सरकारतर्फे मिळणार कार

सवलतींचा वर्षाव : बेरोजगार ब्राह्मण तरुणांना सरकारतर्फे मिळणार कार

वडणुकांचा काळ जवळ आला की, राजकीय पक्ष सोयी-सवलतींची घोषणाबाजी सुरू करतात. आंध्र प्रदेशातल्या तेलुगू देशम पार्टीच्या सरकारनेही आता आश्वासनांची खैरात देणं सुरू केलं आहे.

  • Share this:

अमरावती, 4 जानेवारी : निवडणुकांचा काळ जवळ आला की, राजकीय पक्ष सोयी-सवलतींची घोषणाबाजी सुरू करतात. आंध्र प्रदेशातल्या तेलुगू देशम पार्टीच्या सरकारनेही आता आश्वासनांची खैरात देणं सुरू केलं आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वी 1.40 कोटी स्मार्ट फोन गरजूंना वाटण्यात येतील, अशी घोषणा केली होती. आता त्यात भर म्हणून ब्राह्मण युवकांना स्विफ्ट डिझायर कार देण्यात येणार आहे. स्वयंरोजगार योजनेचा भाग म्हणून अशा 30 गाड्यांचं वाटप बेरोजगार ब्राह्मणांमध्ये केलं जाईल, असं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं.

ब्राह्मण वेलफेअर कॉर्पोरेशन 2 लाखांचं अनुदान गरजू तरुणांना देणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना गाडीची 10 टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे आणि उरलेली रक्कम सरकारी तिजोरीतून देण्यात येईल. या युवकांना ही रक्कम सुलभ कर्जाच्या रुपात देण्यात येणार आहे. ब्राह्मण सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून हे कर्ज देण्यात येईल आणि याची परतफेड व्यवसाय सुरू झाल्यानंतर या लाभधारक युवकांना करावी लागेल.

First published: January 4, 2019, 6:49 PM IST

ताज्या बातम्या