Home /News /national /

अरे देवा! पैसे दुप्पट करण्यासाठी गेलेल्या ब्राम्हणांनाच दक्षिणेत मिळाल्या नकली नोटा

अरे देवा! पैसे दुप्पट करण्यासाठी गेलेल्या ब्राम्हणांनाच दक्षिणेत मिळाल्या नकली नोटा

त्यांनी 17 दिवस होम-हवन केलं. त्यानंतर त्यांना दक्षिणा मागताच त्या महिलेने पैसे असलेली बॅग दिली. त्यात वर असली तर खाली नकली नोटा ठेवल्या होत्या.

    सीतापूर 27 ऑगस्ट: पैसे दुप्पट करण्यासाठी तांत्रिक अनुष्ठान करण्यासाठी बोलावलेल्या ब्राम्हणांनाच फसवल्याची घटना उत्तर प्रदेशात घडलीय. यासाठी होम-हवन करण्यासाठी इथल्या आश्रमाच्या प्रमुख महिलेने अयोध्या आणि इतर ठिकाणांहून तब्बल 61 ब्राम्हण बोलावले होते. त्यांना 17 दिवस हवन केलं. त्यानंतर त्यांनी जेव्हा दक्षिणेत पैसै मागितले त्यावेळी त्यांना महिलेने चक्क नकली नोटा दिल्या. आपलं बिंग फुटते हे लक्षात येताच महिला फरार झाली. सीतापूर इथल्या आश्रमात गीता पाठक या महिलेने पैसे दुप्पट करण्यासाठी सगळ्यांना आमीष दाखवलं आणि होम-हवन केलं. त्यासाठी खास अयोध्येतून 61 ब्राम्हण बोलावले. त्यांनी 17 दिवस होम-हवन केलं.  त्यानंतर त्यांना दक्षिणा मागताच त्या महिलेने पैसे असलेली बॅग दिली. त्यात वर असली तर खाली नकली नोटा ठेवल्या होत्या. आपण फसवले गेलो हे कळताच ब्राम्हणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर गीता पाठकने त्यांना धमकी देत गप्प राहण्यास सांगितलं आणि तिथून पोबारा केला. त्यानंतर रिकाम्या हाताने परतण्याशीवाय त्यांच्या हातात काहीच राहिलं नाही. पोलिसांनी आश्रमाची झडती घेतल्यानंतर त्यांना 20 लाखांच्या नकली नोटा आढळून आल्यात. गीता पाठक विरुद्ध अनेक ठिकाणी या आधीही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत अशी माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या