BPCL कडून ग्राहकांसाठी खुशखबर, Whatsapp वरून बुक करता येणार सिलिंडर

BPCL कडून ग्राहकांसाठी खुशखबर, Whatsapp वरून बुक करता येणार सिलिंडर

घरबसल्या आता Whatsapp वर सिलिंडर गॅस बुक करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 27 मे : भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड (BPCL) कंपनेने ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. 5 व्या लॉकडाऊनची तयारी सुरु असतानाचा कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता देशभरात घरबसल्या आपल्याला सिलिंडर बुक करता येणार आहे. Whatsapp चा वापर करून आपण सिलिंडर घरबसल्या बुक करू शकता. देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकावरची पेट्रोलियम वितरण कंपनी म्हणून ओळख आहे. याशिवाय 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. मंगळवारपासून देशभरातील भारत गॅस (भारत गॅस) ग्राहक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कुठूनही सिलिंडर बुक करू शकतात अशी घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.

सिलिंडर बुक करण्याची काय आहे प्रक्रिया?

कंपनीकडून BPCL स्मार्टलाइन नंबर देण्यात आला आहे. 1800224344 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि आपल्या मोबाईल नंबरच्या Whatsappवरून या नंबरवर बुकिंगसाठी मेसेज करा.

हे वाचा-चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज, आज महत्त्वपूर्ण बैठक

बीपीसीएलचे मार्केटिंग संचालक अरुण सिंह म्हणाले, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एलपीजी बुकिंग करण्याची ही तरतूद ग्राहकांना अधिक सोयीस्कर वाटणार आहे. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाकडे Whatsapp आहे त्यामुळे यामध्यमाचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.

डेबिट, क्रेडिट किंवा UPI द्वारे करता येणार पेमेंट

whatsapp वरून बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना एक मेसेज येईल. त्यामध्ये एक लिंक दिलेली असेल. या लिंकवर जाऊन ग्राहकांना आपली पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ऑनलाईनपद्धतीनं हे पेमेंट करण्यात येईल. एलपीजी डिलिव्हरीवर लक्ष ठेवणे आणि त्याबद्दल ग्राहकांकडून त्यांचा अभिप्राय घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखीन नवीन योजना आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुविधा आणण्याच्या प्रयत्नात असल्याची कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी साखर कारखाने सरसावले, तयार केलं 23 लाख लिटर सॅनिटायझर

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 8:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या