नवी दिल्ली, 11 मे : इन्स्टाग्रामवर तयार कऱण्यात आलेल्या बॉयज लॉकर रूम या ग्रुपमधील चॅटच्या प्रकऱणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. ग्रुपमध्ये बलात्काराची चर्चा व्हायची आणि त्यात बलात्काराची धमकीही दिली जात होती. ती चर्चा करणारी व्यक्ती एक अल्पवयीन मुलगीच होती. दिल्लीत एका शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असून बनावट आयडी तयार करून ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत खुलासा केला. त्यानुसार ग्रुपच्या अॅडमिनला आधी अटक कऱण्यात आली. नोएडातील एका शाळेचा विद्यार्थी आहे. तर ग्रुपशी संबंधित आणखी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
संबंधित ग्रुपशी जोडलेल्या इतर 24 सदस्यांची चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चौकशीत अशी माहिती समोर आली की ग्रुपमध्ये दोन मुलांमध्ये झालेल्या स्नॅपचॅट चर्चेत लैगिक छळाबद्दल चर्चा करण्यात आली होती. यात बलात्कार आणि बलात्कार कऱण्याच्या धमकीबाबत बोलणं झालं होतं. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की, ही चर्चा करणाऱ्या दोनपैकी एक मुलगी आहे. तिने बनावट प्रोफाइल तयार करून सिदार्थ या नावाने ग्रुपमध्ये अॅड झाली. तिने हे सर्व यासाठी केलं की इतर अल्पवयीन मुलांचे संस्कार आणि चरित्र कसे आहे हे जाणून घ्यायचं होतं.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत असं समोर आलं की, या चर्चेत सहभागी असलेला मुलगा बलात्कार आणि धमकीबाबत समहत झाला नाही. पोलिसांनी मुलीची चौकशी केली तेव्हा तिनं हे फक्त गंमत म्हणून केलं असं सांगितलं. यामागे कोणताही उद्देश नव्हता. चर्चा कऱणाऱ्या त्या मुलाची चौकशी झाली.
हे वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, भावजयीच्या नावावरील बियर बारला ठोकलं सील!
सायबर सेलनं केलेल्या तपासात समोर आलं की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या बॉयज लॉकर रूम या ग्रुपमध्ये 24 पेक्षा जास्त सदस्य होते. त्यात मुलींचे अश्लील फोटो टाकून त्यांच्या बलात्काराची चर्चा होत असे. मात्र हे सगळं चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर इन्स्टाग्रामकडून ग्रुपची सर्व माहिती मागवली होती.
हे वाचा : क्षणभर रागाने कुटुंब संपलं, पत्नी आणि मुलाचा जीव घेतल्यावर पतीचं धक्कादायक कृत्य