S M L

बॉयफ्रेन्ड भाड्याने देणे आहे; गुडगावच्या तरूणाची व्हॅलेंटाईन ऑफर

या तरूणाचं नाव आहे शार्दुल. गुडगावचा या श्रीमंत मुलाने बॉयफ्रेन्ड म्हणून भाड्याने देण्याचं ठरवलं आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 14, 2018 05:38 PM IST

बॉयफ्रेन्ड भाड्याने देणे  आहे;  गुडगावच्या तरूणाची व्हॅलेंटाईन ऑफर

14 फेब्रुवारी: व्हॅलेंटाईनचा सण हा प्रेमी युगुलांचा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाला बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्ड साजरा करतात.पण सगळ्यांना बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्ड असतातच असं नाही. अशांसाठीच दिल्लीच्या तरूणाने बॉयफ्रेन्ड भाडयाने देणे आहे अशी अजब ऑफर दिली आहे.

या तरूणाचं नाव आहे शार्दुल. गुडगावचा या श्रीमंत मुलाने बॉयफ्रेन्ड म्हणून भाड्याने देण्याचं ठरवलं आहे. तशी जाहिरातही त्याने फेसबुकवर पोस्ट केली आहे . एवढंच नाही तर जशा कंपनीज वेगवेगळे पॅकेजेसही याने जाहीर केले आहे. पहिल्या पॅकेजमध्ये हात धरणे आणि खांद्याभोवती हात धरणे, दुसऱ्यामध्ये त्यासोबत हातांवर किस करणे असे चार -पाच पॅकेजेस आहेत. यातलं पाचवं पॅकेजमध्ये मुलींना हवं ते करायला तयार आहे असं म्हटलंय. याशिवाय मुलींना हसवण्यासाठी अजून सोयी आहेत ऑडीमधून राईड आहे. ज्या मुली उत्सूक असतील त्यांनी कमेन्ट करावी असं तो शेवटी म्हणतो. गंमत म्हणजे या पोस्टवर 23 हजारहून जास्त कमेन्ट आल्या आहेत. आता किती मुली या एक्सक्लुझिव ऑफरचा फायदाो उठवतात हे त्यालाच माहित.

पण बॉयफ्रेन्ड भाड्याने देण्याच्या ऑफरमुळे प्रेम खऱंच इतकं स्वस्त आहे का आणि विकण्यासारखं आहे का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close