मराठी बातम्या /बातम्या /देश /Valentine's Day निमित्त 'Boyfriend on Rent'; इंजिनीअरची अजब योजना!

Valentine's Day निमित्त 'Boyfriend on Rent'; इंजिनीअरची अजब योजना!

प्रियकर रेंटवर कसा मिळू शकतो? वाचा सविस्तर...

प्रियकर रेंटवर कसा मिळू शकतो? वाचा सविस्तर...

प्रियकर रेंटवर कसा मिळू शकतो? वाचा सविस्तर...

  पाटना, 14 फेब्रुवारी : आज जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन्स डे (Valentine Day) अर्थात प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा हा दिवस तरूणाईसाठी तर अगदी खास असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर हा दिवस अविस्मरणीयरीत्या साजरा करण्यासाठी खास पद्धतीनं याचं आयोजन केलं जातं.

  सगळीकडे आज प्रेमाच्या गुलाबी रंगाचा उत्साह व्यापून राहिलेला दिसतो. मात्र काहीजण एकटेच असतात. त्यांना जोडीदार मिळालेला नसतो किंवा त्यांच्या आवडत्या व्यक्तीनं त्यांचे प्रेम स्वीकारलेलं नसतं. असे लोक खूप दु:खी, उदास असतात. यावर बिहारमधील (Bihar) एका इंजिनीअर तरुणानं (Engineer Boy) एक अजब उपाय काढला आहे. त्यानं चक्क भाड्याने बॉयफ्रेंड (Boyfriend on Rent) म्हणून उपलब्ध असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर हा तरुण आणि त्याची ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाली आहे.

  आजतकने दिलेल्या वृत्तानुसार बिहारमधील दरभंगा (Darbhanga) इथं राहणारा आणि दरभंगा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेणारा प्रियांशू (Priyanshu) हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आपल्या गळ्यात एक पाटी अडकवून फिरत आहे. या पाटीवर त्यानं 'Boyfriend on Rent ' अर्थात 'बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल' असं लिहलं आहे. ही पाटी गळ्यात अडकवून त्यानं दरभंगा शहरातील राज किल्ला, दरभंगा टॉवर, बिग बझार अशा अनेक प्रसिद्ध आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन आपले फोटो काढले असून, ते आपल्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत.

  हे ही वाचा-Kiss day ला लग्न, Valentine's day ला अटक; Couple सोबत भलतच घडलं!

  या अजब जाहिरातीतून लोकांमध्ये प्रेमाचा प्रसार करण्यासह देशावर प्रेम करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं त्यानं म्हटलं आहे. आजची तरुण पिढी स्पर्धात्मक वातावरणामुळे खूप ताणतणावाचा सामना करत असते. अनेकजण नैराश्यातही जातात. त्यामुळे जे एकटे आहेत, त्यांना प्रेम मिळावे, अशी त्याची इच्छा आहे. त्याचवेळी आजकाल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड बनवण्याचे प्रस्थ वाढले आहे. प्रत्येकाला आपल्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असलीच पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळं बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड करायची आणि काहीच दिवसात ब्रेकअप करायचे, पुन्हा नवीन बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड शोधायची असा ट्रेंड वाढला आहे. मात्र यापेक्षा तरुणांनी आपल्या देशाच्या विकासासाठी (Country's Development) योगदान दिलं पाहिजे असं प्रियांशूला वाटतं. त्यामुळे अशी उपहासात्मक जाहिरात करून तरुणाईत योग्य संदेश देण्याचाही त्यानं प्रयत्न केला आहे.

  त्यामुळे प्रियांशूच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Bihar, Valentine day