Home /News /national /

जिवापाड प्रेम केलेल्या प्रेयसीला दिला भयंकर मृत्यू; गोड बोलून लॉजवर बोलवलं अन्...

जिवापाड प्रेम केलेल्या प्रेयसीला दिला भयंकर मृत्यू; गोड बोलून लॉजवर बोलवलं अन्...

प्रियकरानं 5 वर्षे जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचीच निर्घृण हत्या केली आहे.

प्रियकरानं 5 वर्षे जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचीच निर्घृण हत्या केली आहे.

प्रियकरानं 5 वर्षे जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचीच निर्घृण हत्या (Girlfriend brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    जयपूर, 08 सप्टेंबर: प्रियकरानं 5 वर्षे जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचीच निर्घृण हत्या (Girlfriend brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं प्रेयसीला लॉजवर बोलवून तिच्यावर चाकूनं दहा वेळा वार (Attack with knife) केले आहेत. विशेष म्हणजे यानंतर आरोपीनं स्वत: देखील रेल्वेसमोर उडी घेऊन आयुष्याचा शेवट केला (Accused boyfriend Commits suicide) आहे. या दोन्ही घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. संबंधित खळबळजनक घटना राजस्थानातील जोधपूर येथील असून लक्षिता असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी पाली जिल्ह्यातील सोजत रोड येथील रहिवासी आहे. तर तिच्या प्रियकाराचं नाव हेमंत असून तो नागौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मृत तरुणी जोधपूर याठिकाणी वसतीगृहात राहून कायद्याचं शिक्षण घेत होती. दरम्यान तिची ओळख हेमंतशी झाली होती. यानंतर दोघांत प्रेम संबंध सुरू झाले होते. दोघंही मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. हेही वाचा-एकटीला पाहून रुममध्ये शिरला अन्...; IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत कुकचं विकृत कृत्य दरम्यान मागील आठवड्यात मृत तरुणी लक्षिता हिने अन्य एका तरुणासोबत साखरपुडा उरकला होता. यामुळे हेमंतला लक्षिताचा राग आला होता. दरम्यान सोमवारी रात्री दोघंही जोधपूरमधील जालोरी गेट येथील सिद्धीविनायक लॉजमध्ये मुक्कामी थांबले होते. पण यावेळी हेमंतचा वेगळाच डाव होता. प्रेयसीनं दुसऱ्या तरुणासोबत साखरपुडा केल्याच्या रागातून आरोपी हेमंतनं लक्षितावर धारदार चाकूनं तब्बल दहा वार केले. या हल्ल्यात लक्षिता रक्ताच्या थारोळ्यात पडली. यातचं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेही वाचा-कॉलेजमधील मित्रानं केला घात! गुंगीचं औषध देत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार यानंतर आरोपी हेमंतनं मंडोर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी हेमंतचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मंडोर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हेमंतच्या खिशातील ओळखपत्रातून तो नागौरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. यानंतर याच दिवशी सायंकाळी सिद्धिविनायक हॉटेलच्या खोलीत 25 वर्षीय लक्षिताचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला आहे. तिच्या शरीरावर चाकूनं अनेक वार केल्याच्या खुणा दिसत होत्या. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह संबंधितांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Rajasthan

    पुढील बातम्या