Home /News /national /

प्रेयसीचा विरह लागला जिव्हारी; तरुणाने गळफास लावून सेल्फी काढत कुटुंबाला पाठवला अन्...

प्रेयसीचा विरह लागला जिव्हारी; तरुणाने गळफास लावून सेल्फी काढत कुटुंबाला पाठवला अन्...

या संशोधनानुसार महिला पुरषांकडे भावनिक आकर्षणाने (Emotional Attraction) पाहतात. त्याउलट पुरुष महिलांकडे शारीरिकरित्या (Physically) आकर्षिले जातात. यासंदर्भात याआधीही काही संशोधन झालेले आहेत. संशोधक डॉक्टर स्टीफन व्हाइट (Dr.Stephen White)यांच्यामते वयानुसार पुरुष आणि महिलांच्या गरजा बदलायला लागतात.

या संशोधनानुसार महिला पुरषांकडे भावनिक आकर्षणाने (Emotional Attraction) पाहतात. त्याउलट पुरुष महिलांकडे शारीरिकरित्या (Physically) आकर्षिले जातात. यासंदर्भात याआधीही काही संशोधन झालेले आहेत. संशोधक डॉक्टर स्टीफन व्हाइट (Dr.Stephen White)यांच्यामते वयानुसार पुरुष आणि महिलांच्या गरजा बदलायला लागतात.

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने एका युवकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आधी गळफास लावलेला फोटो कुटुंबाला आणि मित्रांना पाठवला, यानंतर त्याने स्वतःला संपवलं आहे.

    हमीरपूर, 06 जून: प्रेयसीचं लग्न (Girlfriend get married) झाल्याची बातमी कळताच एका युवकाने झाडाला गळफास (Boyfriend commits suicide) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाने आधी शेतात जाऊन गळफास लावलेला सेल्फी (Took selfie before suicide) काढला. तो सेल्फी कुटुंबाला आणि मित्रांना पाठवला, त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. आपल्या मुलाच्या गळ्यात फास पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आपला मुलगा कुठे आहे, याबाबतची काहीही माहिती कुटुंबाकडे नसल्याने त्यांना प्रचंड धावपळ करावी लागली. रात्री उशीरा एका शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या जखेडी गावातील आहे. येथील 19 वर्षीय मृत तरुण लक्ष्मी प्रसाद प्रजापती याचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. यामुळे मृत तरुण अस्वस्थ झाला होता. अस्वस्थ झाल्यानंतर तो राजस्थानातील अलवर याठिकाणी एका कंपनीत काम करण्यासाठी निघून गेला. दरम्यान, शुक्रवारी मृत तरुण लक्ष्मी प्रसाद प्रजापती राजस्थानावरून आपल्या गावी बसने परत येत होता. तेव्हा त्याला प्रेयसीचं लग्न झाल्याची माहिती मिळाली. प्रेयसीचं लग्न झाल्याची माहिती तरुणाची जिव्हारी लागली. त्यामुळे त्याने ललपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वासा याठिकाणीचं बसमधून खाली उतरला. आणि बाजूच्याच एका शेतात जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे ही वाचा-मुंबईत डॉक्टर तरुणीची आत्महत्या; भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन दिला जीव आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गळफास लावल्याचा फोटो काढून आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने जीव दिला आहे. पण हा फोटो मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याला सर्वत्र शोधलं. पण त्याचा काही थांगपत्ता सापडला नाही. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. रात्री उशीरा पोलिसांनी तरुणाने आत्महत्या केल्याची जागा शोधून काढली. यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Love story, Suicide, Uttar pradesh

    पुढील बातम्या