Home /News /national /

प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून चढला प्रियकराचा पारा; स्टेजवरच धक्कादायक कृत्य

प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून चढला प्रियकराचा पारा; स्टेजवरच धक्कादायक कृत्य

वधूच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर वराने लग्नास नकार दिला. नवरदेवाच्या या निर्णयामुळे नवरीकडील लोक आणखीच नाराज झाले.

    पाटणा 07 जुलै : बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यादरम्यान (Weird Incident During Marriage Function) एक विचित्र घटना समोर आली आहे. यात प्रेयसीचं लग्न होताना पाहून प्रियकर भडकला आणि त्याने स्टेजवर चढून सर्वांसमोर नवरीच्या गळ्यात वरमाळा घातली. विक्षिप्त तरुणाने वधूच्या डोक्यात कुंकूही लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून स्टेजवर उपस्थित नवरदेवही थक्क झाला. समारंभात उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. वधूच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर वराने लग्नास नकार दिला. नवरदेवाच्या या निर्णयामुळे नवरीकडील लोक आणखीच नाराज झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हरनौत पोलीस स्टेशन हद्दीतील मुबारकपूर गावचं आहे. मुबारकपूर गावातील रहिवासी असलेल्या मुकेशचे गेल्या एका वर्षापासून गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी तिचं लग्न अन्यत्र ठरवलं. लग्नात वरमुलगा समोर आल्यावर वधूला बसला धक्का, खोलीत जाऊन उचललं टोकाचं पाऊल मंगळवारी रात्री मुलीची वरात आली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वरमाळेच्या कार्यक्रमावेळी प्रियकर मुकेश हातात फुलांचा हार आणि सिंदूर घेऊन स्टेजवर चढला आणि नववधूच्या गळ्यात त्याने हा हार घातला. यानंतर त्याने नवरीच्या डोक्यात कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर नवरदेव लग्न न करताच वरात घेऊन परत गेला. वरात परतल्याने वधूपक्षाचे लोक आणखीच भडकले आणि त्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. सध्या त्याला बिहारशरीफ येथील सदर रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. साखरपुडा मोडला गेल्याने तरुणीचं टोकाचं पाऊल, होणारा पती अन् त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल प्रियकर मुकेशने सांगितलं की, त्याचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहाण्याचं ठरवलेलं असा दावा त्याने केला आहे. असं असतानाही मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्या प्रेयसीचं बळजबरीने दुसऱ्याशी लग्न लावून दिलं. मुकेशने सांगितलं की, प्रेयसीने त्याला सांगितलं होतं की, जेव्हा तिचं लग्न होणार असेल तेव्हा त्याने वरमाळेच्या वेळी येऊन तिच्या डोक्यात सिंदूर भरावा, त्यानंतर मी तसंच केलं. या संपूर्ण घटनेनंतर वराने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला आणि लग्न न करताच परतला. यानंतर प्रियकर खोटे दावे करत असल्याचं वधूच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तरुणाचे त्यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध नव्हते, असंही ते म्हणाले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Shocking news, Wedding

    पुढील बातम्या