गर्लफ्रेंडचा 2 वर्षापासून अबोला; नाकाचा चावा घेत ब्रॉयफ्रेंडनं काढला पळ

गर्लफ्रेंण्ड बोलत नाही या रागातून ब्रॉयफ्रेंडनं चक्क तिच्या नाकाचा चावा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 07:30 PM IST

गर्लफ्रेंडचा 2 वर्षापासून अबोला; नाकाचा चावा घेत ब्रॉयफ्रेंडनं काढला पळ

अहमदाबाद, 17 एप्रिल : गर्लफ्रेंडचा राग आला म्हणून गर्लफ्रेंडच्या ओठांचा चावा घेण्याचा प्रकार समोर आला होता. पण, आत्ता चक्क गर्लफ्रेंड बोलत नाही म्हणून तिच्या नाकाचा चावा घेण्याचा प्रकार समोर आला आहे. धक्का बसला ना? पण, गुजरातमध्ये हा प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील अहमदाबादमधल्या चांदखेडा या परिसरात हा सारा प्रकार घडला आहे.

मंजू परमार या 24 वर्षाच्या युवतीचं केशवलाल नावाच्या मुलासोबत प्रेम संबंध होते. काही काळानं तरूणी बहिणीच्या घरी चांदखेडा येथे राहायाला आली.शिवाय, मागील दोन वर्षापासून दोघांमध्ये संवाद देखील नव्हता. त्यामुळं केशवलाल अस्वस्थ होता. मंजू आपल्याशी बोलत नाही ही बाब केशवलालच्या मनात सलत होती. काहीही करून तिच्याशी बोलायचं असा निश्चय करून केशवलाल चांदखेडा येथे आला.


बॉयफ्रेंडनं KISS करताना रागात गर्लफ्रेंडच्या ओठाचा घेतला चावा, तरुणी रक्तबंबाळ


Loading...

...अन् त्यानं घेतला तिच्या नाकाचा चावा


मंजू एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत होती. त्याच ठिकाणी केशवचा मित्र देखील काम करत होता. मंजू देखील याच ठिकाणी काम करत असल्याची माहिती केशवच्या मित्रानं दिली. त्यानंतर केशव चांदखेडा येथे आला आणि मंजूवर नजर ठेवू लागला.

एके दिवशी केशवनं संधी साधली. सकाळी प्रातर्विधी मंजू जात असताना केशवनं मंजूची वाट अडवली. त्यावेळी मंजूनं वाट सोडण्यास सांगितलं. पण, केशव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत असं मंजून केशवला सांगितलं. पण, केशव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर राग अनावर झाल्यानं केशवनं मंजूच्या नाकाचा चावा घेतला. यावेळी मंजूचा आवाज ऐकून आजूबाजुची लोकं गोळा झाली. पण, त्यापूर्वीच केशवनं त्याठिकाणावरून पळ काढला होता. त्यानंतर मंजुला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी देखील केशवच्या विरोधात एफआयआर दाखल केला केला असून त्याचा शोध सुरू आहे.


जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...