• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 20 महिन्याच्या मुलासह बॉयफ्रेंडच्या घरासमोर ठाण मांडून बसली तरुणी, 4 दिवसाने त्याने केला स्वीकार पण...

20 महिन्याच्या मुलासह बॉयफ्रेंडच्या घरासमोर ठाण मांडून बसली तरुणी, 4 दिवसाने त्याने केला स्वीकार पण...

केवटली गावात कमरुल नावाची एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडच्या दारात चार दिवस ठाण मांडून बसली होती, ते देखील त्यांच्या 20 महिन्याच्या मुलाला घेऊन!

 • Share this:
  जौनपूर, 09 मे: एखाद्या बॉलिवूड कथानकाला शोभेल अशी कहाणी जौनपूरमधील महाराजगंज (Uttar Pradesh News) परिसरातून समोर येते आहे. याठिकाणी असणाऱ्या केवटली गावात एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडच्या (Girlfriend-Boyfriend Issue) दारात चार दिवस ठाण मांडून बसली होती, ते देखील त्यांच्या 20 महिन्याच्या मुलाला घेऊन! या तरुणीचं नाव कमरुल आहे. या तरुणीनं धरणं धरल्यानंतर अखेर चार दिवसांनी तिच्या बॉयफ्रेंडनं तिला आणि मुलाला स्विकारलं पण त्यानंतर पुन्हा याठिकाणी 'कहानी मैं ट्विस्ट' आला. या दोघांच्या नात्याला मुलाच्या घरच्यांनी मंजुरी दिली नाही, त्यामुळे हे दोघेजण सध्या एका झाडाखाली राहत आहेत. सीओ बदलापूर चोप सिंह यांच्या उपस्थितीत या दोघांनी यापुढे एकत्र राहण्याबाबत लिहून दिले आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा-कर्मचारी झोपल्याचं पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच सॅनिटाइज केलं शहर, पाहा VIDEO शनिवारी पोलिसांच्या उपस्थितीत दोघांनी घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी देखील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न फोल ठरले. कुटुंबीयांनी दरवाजा उघडण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना इतरत्र  काहीतरी व्यवस्था करण्यास सांगितले, मात्र इतर काही साधन उपलब्ध नसल्याने आता हे प्रेमीयुगूल एका झाडाखाली राहत आहे. हे वाचा-15 दिवस मृत रुग्णाला जिवंत सांगत राहिले डॉक्टर, कारण समजताच हादरले कुटुंबीय कमरुलच्या मते तिच्या वडिलांनी त्यांच्या घरात एक खोली देण्याचे कबुल केले होते, पण आता त्यांचाही फोन लागत नाही आहे. त्यामुळे आणखी तीन दिवस वाट पाहून पुढील निर्णय घेण्याचे त्या दोघांनी ठरवले आहे. पोलिसांनीच चार दिवस धरणं देणाऱ्या या मुलीसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. पोलिसांनी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये मध्यस्थी देखील केली. तिच्या बॉयफ्रेंडच्या मते तो आधीपासून तिच्याबरोबर राहण्यास तयार होता, पण त्याच्या घरच्यांनी विरोध केल्याने त्यांचं नात पुढे जात नव्हतं.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: