'हज यात्रा बंद करा!' मुस्लीमच करत आहेत मागणी; हे आहे कारण

'हज यात्रा बंद करा!' मुस्लीमच करत आहेत मागणी; हे आहे कारण

हज यात्रेवर बंदी घालावी अशी मागणी आता जगातील मुस्लिमांनी केली आहे.

  • Share this:

दुबई, 09 जुलै : हज यात्रा मुस्लिमांसाठी पवित्र. आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक मुस्लीम बांधवाची इच्छा असते. पण, आता जगातील मुस्लिमांनी हज यात्रेला विरोध करायला सुरूवात केली आहे. वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना? सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हज यात्रा आणखी सोपी करण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यानंतर देखील आता हज यात्रेला सुरूवात झाली आहे. जगभरातील मुस्लिमांनी दर्शवलेल्या विरोधानंतर आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सौदी अरेबियामध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू आहे. सध्या सौदीचे राजा जो काही निर्णय घेत आहेत त्याला काही मुस्लिमांचा आणि धार्मिक संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे एक वर्षभरापासून हज यात्रेवर बहिष्कार घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. एप्रिलमध्ये लिबियातील प्रसिद्द मौलवी मुफ्ती सादिक अल – घरीआनी यांनी देखील हज यात्रेवर बहिष्काराची मागणी केली. त्यानंतर बहिष्काराच्या मागणीला आणखी जोर चढला.

अमेरिकेत पूर, व्हाईट हाऊसमध्ये शिरलं पाणी!

सौदीच्या गंगाजळीत पडतेय भर

दरम्यान, हज यात्रेमुळे मिळणाऱ्या पैशांतून सौदी अरेबियाच्या गंगाजळीमध्ये वाढ होते. तर, या पैशांचा वापर हा दहशतवादासाठी केला जात असल्याचा आरोप लिबियातील प्रसिद्द मौलवी मुफ्ती सादिक अल – घरीआनी यांनी केला. या पैशातून शस्त्र खरेदी करून त्यांचा वापर हा लिबिया, ट्यनेशिया, सुदान, अल्जेरियामध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

कर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर

सौदी अरेबियामध्ये वाढला दहशतवाद

Foreign Policy.comच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबियाकडून पुरवल्या जाणाऱ्या बॉम्बचा वापर येमेनमध्ये केला जात आहे. यामध्ये हजारो लोकांचा जीव गेला आहे. शिवाय, पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येवरून देखील मोठा गदारोळ झाला होता.

ट्विटरवर ट्रेंड

सध्या हज यात्रेवरील बंदीची मागणी ट्विटरवर देखील ट्रेंड होत आहे. त्यासाठी #boycotthajj वापरलं जात आहे.

सौदीला महत्त्व का?

मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेली मक्का, मदीना आणि मोहम्मद पैंगबर आणि काबा यांची मजीर याच देशात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला आता इस्लामिक देशाचं नेतृत्व करायचं आहे.

SPECIAL REPORT: पाकिस्तानातील बैलगाडीचा हा थरार पाहिला का?

First published: July 9, 2019, 3:41 PM IST
Tags: #hajmuslim

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading