मुंबईहून 1600 किमी चालत गाठलं घर, क्वारंटाइन केल्यानंतर 6 तासांतच...

मुंबईहून 1600 किमी चालत गाठलं घर, क्वारंटाइन केल्यानंतर 6 तासांतच...

मुंबईहून तब्बल 1600 किमी चालत उत्तर प्रदेशातील श्रावस्ती या गावी पोहचला. मात्र 14 दिवस तर सोडा 14 तासही आपल्या गावी त्याला काढता आले नाही.

  • Share this:

कानपूर, 28 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सध्या 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हजारो लोकं घरापासून दूर अडकले आहेत. काहींनी चालत तर काहींनी मिळेल त्या मार्गानं घर गाठवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असाच एक युवक मुंबईहून तब्बल 1600 किमी चालत उत्तर प्रदेशातील श्रावस्ती या गावी पोहचला. मुंबईहून आल्यामुळं त्याला गावकऱ्यांनी 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यास सांगितले. त्याला गावातील एका शाळेत ठेवण्यात आले. मात्र 6 तासांनी या तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला.

श्रावस्त जनपद येथील मल्हीपूर क्षेत्रातील मठखनवा गावात सोमवारी हा तरूण मुंबईतून चालत पोहचला. बाहेरून आल्यामुळं त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले. मात्र 14 दिवस तर सोडा 14 तासही आपल्या गावी त्याला काढता आले नाही. आपल्या घरच्यांना भेटण्याआधीच त्यानं जगाचा निरोप घेतला.

वाचा-ज्याचं कोणी नाही त्याची शिवसेना! बेवारस मृतदेहावर आमदारानं केले अंत्यसंस्कार

हा युवक सोमवारी सकाळी 7 वाजता मुंबईहून 1600 किमी प्रवास करून आपल्या गावी पोहचला. त्यानंतर त्याला विश्रांतीसाठी एका शाळेत ठेवण्यात आले. मात्र दुपारी 1च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. क्वारंटाइन सेंटरमध्ये या युवकाचा मृत्यू झाल्यामुळं संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाचे उच्च अधिकारी तात्काळ गावात पोहचले. दरम्यान, कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याला पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान या युवकाला कोरोनाची लागण झाली होती का, याची तपासणीही करण्यात येणार आहे.

वाचा-लॉकडाऊननंतर विमान प्रवास करायचा आहे? दाखवावं लागणार मेडिकल सर्टिफेकेट

तर, मृतदेहाजवळ पोहोचलेल्या कुटुंबातील सदस्यांना त्याच शाळेत अलग ठेवण्यात आले. मृतदेहाच्या कुटूंबियांचा असा दावा आहे की 1600 किमी चालून त्याचे शरीर थकले होते, त्याच्यावर उपचार न केल्यानं त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाबद्दल श्रावस्तीचे सीएमओ पी. भार्गव म्हणाले की, त्यांच्या मृत्यू कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही व्यक्ती सोमवारी सकाळी सात वाजता महाराष्ट्रातून आली. आतापर्यंत विशिष्ट काहीही स्पष्ट नाही, काहीही सांगणे कठीण आहे.

वाचा-खूशखबर! भारत 'या' तारखेपर्यंत मिळवणार कोरोनावर विजय, संशोधकांचा सर्वात मोठा दावा

दरम्यान, लॉकडाऊनमुळं आपल्या घरी पोहचण्यासाठी मिळेल त्या मार्गानं लोकं प्रवास करत घरी पोहचत आहेत. हा असा प्रवास सध्या लोकांच्या जीवावर बेतत आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 28, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या