• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • एअरपोर्टवर चिमुकल्यानं केला सैन्याला सॅल्युट, लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा VIDEO

एअरपोर्टवर चिमुकल्यानं केला सैन्याला सॅल्युट, लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा VIDEO

एक लहान मुलगा सैनिकांच्या (Boy salutes soldiers video goes viral) गाडीसमोर आल्यानंतर त्यांना सॅल्युट करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर :  एक लहान मुलगा सैनिकांच्या (Boy salutes soldiers video goes viral) गाडीसमोर आल्यानंतर त्यांना सॅल्युट करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या रोज (Viral video in social media) कुठला ना कुठला व्हिडिओ व्हायरल होत असतो. कधी हे व्हिडिओ गंभीर असतात, तर कधी मजेशीर असतात. मात्र नुकताच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (New video on social media) धुमाकूळ घालत आहे, जो गंभीरही आहे आणि म्हटलं तर भावूक करणाराही आहे. काय आहे व्हिडिओत? एअरपोर्टच्या बाहेर आपल्या वडिलांसोबत एक मुलगा इकडे तिकडे फिरत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. रस्त्यावरून फिरत असताना एका क्षणी तिथं सीआयएसएफच्या जवानांची गाडी येऊन उभी राहते. हा मुलगा चालता चालता त्या गाडीच्या समोर जातो. काही क्षण तो त्या गाडीकडे पाहतो आणि अचानक हात उंचावून सैनिकांना सॅल्यूट करतो. त्याला प्रत्युत्तर म्हणून गाडीत बसलेला गणवेशधारी सैनिकदेखील त्याला सॅल्यूट करतो. वडिलांनाही वाटला अभिमान आपल्या मुलाचा हात धरून त्याला इकडून तिकडे फिरवत टाईमपास करत असताना मुलाच्या या कृतीने त्याच्यासोबत असणारे वडिलही भारावल्याचं दिसतं. वाहनांसाठीच्या वेगवेगळ्या लेन पार करत जात असताना वेगवेगळ्या गाड्यांकडं हा मुलगा पाहत राहतो. मात्र कुठल्याच गाडीपाशी न थांबता तो वडिलांसोबत चालत राहतो. मात्र त्याला जेव्हा सैनिकांची गाडी दिसते, तेव्हा मात्र तो वडिलांना हात ओढून थांबवतो. आता आपला मुलगा काय करेल, याच्या उत्सुकतेनं वडील त्याच्याकडे पाहतात. मुलगा काही क्षण सैनिकांच्या गाडीकडे निरखून पाहतो आणि त्यानंतर आपला उजवा हात कपाळावर घेत त्यांना एक कडक सॅल्यूट ठोकतो. आपल्या मुलाची ही कृती पाहून वडिलांचाही ऊर अभिमानाने भरून येतो आणि त्यानंतर ते गाडीसमोरून हळूच बाजूला होत त्यांना जाण्यासाठी वाट रिकामी करून देतात. हे वाचा-  ठरला शेवटचा Birthday, ड्रग्स माफियांच्या गोळीबारात भारतीय महिलेची हत्या सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रिया हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियातून नेटिझन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हे दृश्य पाहून डोळे पाणावल्याचं एकानं म्हटलंय, तर मुलाचे संस्कार त्याच्या कृतीतून कळतात, असं म्हणत दुसऱ्यानं या मुलाचं कौतुक केलं आहे.
  Published by:desk news
  First published: