Home /News /national /

कोरोना झालेल्या गर्लफ्रेंडची गुपचूप भेट घेऊन तरुण परतला गावी आणि...

कोरोना झालेल्या गर्लफ्रेंडची गुपचूप भेट घेऊन तरुण परतला गावी आणि...

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्लफ्रेंडची तरुणाने गुपचूप भेट घेतली. त्यानंतर तो काही अंतर चालत तर काही अंतर ट्रकने प्रवास करत घरी पोहोचला.

    भोपाळ, 15 मे : कोरोना व्हायरसने देशभर धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक धक्कादायक अशा गोष्टी समोर येत आहेत. मध्य प्रदेशात एक तरुण त्याच्या कोरोनाग्रस्त गर्लफ्रेंडला भेटल्यानं त्याला क्वारंटाइन व्हावं लागलं बिंग फुटलं. तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटून गुपचूप घरी आला. तेव्हा गावात कुजबूज सुरू झाली. कारण त्याच्या गर्लफ्रेंडला कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशातील बैतूल इथंला एक तरुण भोपाळला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. तिला भेटून तो बैतूल इथं घरी परत आला. लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याची ट्रॅव्हल हिस्ट्रि तपासली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. तरुणाची गर्लफ्रेंड कोरोना पॉझिटिव्ह  असल्याचं समजल्यानंतर तरुणाला क्वारंटाइन कऱण्यात आलं. बैतूल जिल्हा आरोग्य अधिकारी आर के धुर्वे यांनी सांगितलं की, भोपाळच्या जवळच असलेल्या एका नर्सिंग होममध्ये काम करणारा तरुण गर्लफ्रेंडला भेटून घरी पोहोचला. भोपाळ ते मंडीदीप इथंपर्यंत तो चालत आला. तिथून एका ट्रकनं बैतूल गाठलं. हे वाचा : बायकोला दिला धोका नंतर गर्लफ्रेंडचा खेळ खल्लास, अशी समोर आली मर्डर मिस्ट्री गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी तरुणाला पाहिलं. त्यानंतर तरुणाची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे केली. तेव्हा समजलं की, तरुणाची गर्लफ्रेंड भोपाळमध्ये राहते आणि ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर त्याला ताबडतोब कस्तुरबा हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं. दरम्यान, तो ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला त्यांनाही होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे वाचा : सावधान! मोबाइल फोनमुळे पसरू शकतो कोरोना, डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या