Home /News /national /

12 वर्षांच्या भावासाठी बहीण लढली! अपहरण करणाऱ्या गुंडांच्या तावडीतून केली सुटका

12 वर्षांच्या भावासाठी बहीण लढली! अपहरण करणाऱ्या गुंडांच्या तावडीतून केली सुटका

मुलाच्या मोठ्या बहिणीच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे.

    अनिल पाटील, गोवा, 23 जानेवारी : शिकवणी वर्ग संपून घरी येत असताना 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. मुलाच्या मोठ्या बहिणीच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे. दोघा संशयितांनी बुधवारी सायंकाळी हा मुलगा आणि त्याची मोठी बहीण शिकवणी करून घरी येत असताना या मुलाला गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाच्या मोठ्या बहिणीने त्याला ओढून घेतले आणि आरडाओरडा केला. त्याचवेळी तिथं शिकवणीहून येत असलेल्या इतर मुलांनी गाडीचा नंबर नोंद केला. धनंजय मुडेंबद्दल नीट बोल नायतर DIRECT 302, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरपंचाला बेदम मारहाण ही घटना शिकवणी वर्गाच्या शिक्षकाला सांगताच त्यांनी इतरांच्या मदतीने गाडीचा शोध घेतला आणि गाडीत असलेल्या विश्वजीत पांडे (रा ओडिशा) आणि शनिराज बार (रा.उत्तर प्रदेश) या दोघांना नागरिकांनी पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. अहमदनगरमध्ये वाळू तस्कर आणि पोलिसांचीच अभ्रद्र युती, व्हायरल व्हिडिओमुळे फुटले बिंग! पोलिसांनी या दोघांना अटक केली असून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलं आणि नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे . पोलिसांनी भारतीय दंड संहिता 363, 511 आणि गोवा बाल कायदा कलम आठ नुसार गुन्हा नोंद असून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Goa

    पुढील बातम्या