Suicide: धक्कादायक! सावळा रंग असल्यानं नैराश्यातून मुलाची आत्महत्या

Suicide: धक्कादायक! सावळा रंग असल्यानं नैराश्यातून मुलाची आत्महत्या

विद्यार्थ्यानं आपल्या रंगामुळे आत्महत्या केली (Boy Commit Suicide) असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सगळ्यांनाच विचार करण्यास भाग पाडणारी आहे. सावळ्या रंगामुळे हा मुलगा डीप्रेशनमध्ये गेला होता आणि याच कारणामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.

  • Share this:

नोएडा 07 मार्च : जग एकीकडे आधुनिकीकरणाकडे चाललं असतानाच दुसरीकडे रंगावरुन भेदभाव करणं किंवा सुंदरतेची व्याख्या करणं आजही सुरुच आहे. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टी पाहातो मग त्या एखाद्या क्रीमच्या (Fairness Cream) किंवा साबणाच्या जाहिराती असो किंवा आणखी काही. गोरा रंगच कसा सुंदर असतो, हीच गोष्ट नकळतपणे समाजाच्या मनात बिंबवली जाते. वरवर खूप साध्या वाटणाऱ्या या गोष्टी अनेकांना डिप्रेशनमध्ये जाण्यास भाग पडतात. अशीच एक घटना आता समोर आली असून यात एका मुलानं सावळ्या रंगामुळं आत्महत्या (Suicide) केली आहे.

ही घटना आहे नोएडा ठाणा सेक्टर 49 च्या क्षेत्रातील महागून सोसायटीमधील. येथे एका विद्यार्थ्यानी 15 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडणारं आहे. या विद्यार्थ्यानं आपल्या रंगामुळे आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सगळ्यांनाच विचार करण्यास भाग पाडणारी आहे. सावळ्या रंगामुळे हा मुलगा डीप्रेशनमध्ये गेला होता आणि याच कारणामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या घटनेचा तपासही सुरू केला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सेक्टर 49 ठाणा क्षेत्राच्या महागून मॉडर्न सोसायटीमध्ये राहाणाऱ्या या तरुणानं 6 मार्चला सकाळी अपार्टमेंटच्या 15 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. चौकशीदरम्यान मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितलं, की सावळा रंग असल्यानं हा विद्यार्थी मानसिक तणावात होता. आपल्या रंगामुळे तो अनेकदा नाराज असायचा आणि कुटुंबीयांकडे याबद्दल तक्रारही करायचा.या मुलाचे आई वडील विभक्त राहातात. त्यामुळे या दृष्टीनंही तपास केला जाणार आहे. मागील एका वर्षात शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात आर्थिक आणि मानसिक स्थिती बिघडल्यानं अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका वर्षात या शहरात 500 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: March 7, 2021, 4:25 PM IST

ताज्या बातम्या