Home /News /national /

कृषी कायदा मागे घ्या, अन्यथा ‘खेल रत्न’ परत करणार 'या' खेळाडूने दिला सरकारला इशारा!

कृषी कायदा मागे घ्या, अन्यथा ‘खेल रत्न’ परत करणार 'या' खेळाडूने दिला सरकारला इशारा!

शेतकरी आंदोलनात (Farmer Protest) बॉक्सर विजेंदर सिंहने (Boxer Vijender Singh) देखील उडी घेतली आहे. सरकारने विधेयक मागे घेतले नाही तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) परत देण्याचा इशारा विजेंदरने दिला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 6 डिसेंबर:   राजधानी दिल्लीच्या (Delhi) सीमेवर कृषी कायदा (Farm Laws) च्या विरुद्ध सुरु असलेले आंदोलन सलग 11 व्या दिवशी सुरु आहे. या आंदोलनाला आता पुरस्कार वापसीचंही स्वरुप आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Prakash Singh Badal) यांनी या कायद्याच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वीच पद्मविभूषण पुरस्कार सरकारला परत दिला. आता या प्रकरणात बॉक्सर विजेंदर सिंहने (Boxer Vijender Singh) देखील उडी घेतली आहे. सरकारने विधेयक मागे घेतले नाही तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) परत देण्याचा इशारा विजेंदरने दिला आहे. विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर मागील लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. विजेंदरने 2008 मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. या कामगिरीबद्दल 2009 साली त्याचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. ऑलिम्पिक पदकासोबतच विजेंदरने 2009 साली झालेली वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि 2010 मधील कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्याचबरोबर 2006 आणि 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. आजवरची चर्चा निष्फळ केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात आजवर झालेली चर्चा निष्फळ झाली आहे. दरम्यान केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी विरोधकांवर शेतकऱ्यांना चिथवल्याचा आरोप केला आहे. “शेतकऱ्यांनी कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नये. एमएसपी यापूढे देखील सुरु राहणार आहे. हे आम्ही लेखी देखील देऊ शकतो,” असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या