• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'मोदीजी, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा', महिला बॉक्सरचं पंतप्रधानांना आवाहन

'मोदीजी, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा', महिला बॉक्सरचं पंतप्रधानांना आवाहन

दुबईमध्ये सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धेत स्वीटी बूरा (Saweety Boora) हिने कांस्य पदक (Bronze Medal) पटकावले आहे. या कामगिरीनंतर तिने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आवाहन केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 मे: दुबईमध्ये सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धेत (Asian Championship Dubai) स्वीटी बूरा (Saweety Boora) हिने कांस्य पदक (Bronze Medal) पटकावले आहे. स्वीटीने हे पदक शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित केले आहे. त्याचबरोबर महामारीच्या काळातही गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) विचार करावा असं आवाहन तिने केले आहे. स्वीटीने याबाबत एक ट्विट करुन म्हंटले आहे की, ' दुबईमध्ये 21 मे पासून सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे. मी हे पदक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करते.त्याचबरोबर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की,  गेली अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्यावर विचार करावा.' कोण आहे स्वीटी बुरा? स्वीटी बुरा ही हरियाणातील हिसार गावातील बॉक्सर आहे. तिचे वडिल महेंद्रसिंह हे शेतकरी आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रीय बास्केटबॉल देखील खेळले आहेत. स्वीटीने 2014 पासून वेगवेगळी आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. भारताच्या प्रमुख महिला बॉक्सरमध्ये तिचा समावेश होतो. शहीद पतीचं स्वप्न पूर्ण...लेफ्टनंट ''निकिता कौल धौंडियाल'' भारतीय सैन्यात दाखल संसदेत संमत झालेल्या कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र अजूनही त्यावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या स्वीटीने आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर या विषयावर थेट पंतप्रधानांना आवाहन केले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: