बहराइच (उत्तर प्रदेश), 17 मे : लॉकडाऊनमध्ये मजुरांची पायी चालणारी छायाचित्र पाहून अस्वस्थ व्हायला होतं. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील एक विद्यार्थिनी गरजुंना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. या विद्यार्थिनीने चपलांची विक्री होत नसल्याने निराश झालेल्या एका गरीबाकडून सर्व चप्पलांचे जोड खरेदी केले आणि चपलांशिवाय चालणाऱ्या प्रवाशांमध्ये मोफत वाटले.
चप्पल तुटली तर असाच सुरू होता प्रवास
बहराइच शहरातील कॅम्प परिसरातील कपड्याचे व्यावसायिक ज्योती मोदी यांची मुलगी आणि लखनऊमधील एका संस्थेतून मेकअप आर्टिस्टचा कोर्स करणारी यश्वी ही लॉकडाऊनमध्ये बहराइच येथे आपल्या आई-वडिलांसह राहत आहे. या भागात मोठ्या संख्येने प्रवासी मजूर येत आहेत. मोठ्या संख्येने मजूर पायी प्रवास करीत आहेत. अनेकदा मजुरांची चप्पल घासून घासून तुटते. मात्र तरीही त्यांचा प्रवास सुरूच आहे. या विद्यार्थिनीने आपल्याच घराजवळील चप्पल विकणाऱ्या फेरीवाला एका जागी बसून रडत असल्याचे पाहिले. चप्पल विकत नव्हती..त्यात त्याची तब्येतही बरी नव्हती. मात्र पोटा-पाण्यासाठी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. यावेळी त्या विद्यार्थिनीने त्या म्हाताऱ्या माणसाकडून सर्व चप्पल विकत घेतली. यानंतर स्थानिक समाजसेवी संदीप मित्तल यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने प्रवासी मजुरांना या चपलांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थिनीच्या या एका पुढाकाराने कित्येकांना मदत मिळाली.
संबंधित-राष्ट्रपती भवनात तैनात पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; कर्मचारी क्वारंटाईन
निलंबित डॉक्टरचे सरकार विरोधात आंदोलन, पोलिसांनी हात बांधून रिक्षात घालून नेलं