Home /News /national /

भाजप नेता रावणाच्या पोटी जन्मलेला, महात्मा गांधींविरोधातील विवादास्पद वक्तव्यामुळे संसदेत खळबळ

भाजप नेता रावणाच्या पोटी जन्मलेला, महात्मा गांधींविरोधातील विवादास्पद वक्तव्यामुळे संसदेत खळबळ

...ते म्हणाले हे गोडसेचे सरकार आहे

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या विवादास्पद वक्तव्यामुळे भाजपला तीव्र विरोधाला समोरे जावे लागले. यादरम्यान कॉंग्रेस संसदीय दलाचे नेता अधीर रंजन चौधरींनी हेगडेंसारखे भाजप नेता हे रावणाच्या पोटी जन्मलेले आहेत, अशी विवादास्पद प्रतिक्रिया दिली आहे. भाजप खासदारांनी चौधरींच्या य़ा वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि गोंधळ करीत सदनमधून बाहेर निघून गेले. लोकसभात शून्य प्रहरमध्ये कॉंग्रेस खासदार रंजन चौधरी म्हणाले, देशभरात नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC)) विरोधात शांतिपूर्ण प्रदर्शन सुरू आहेत. आम्ही महात्मा गांधींच्या आदर्शांवर चालत शांततेने आंदोलन करीत आहोत. यानंतर चौधरी पुढे जाऊन म्हणाले, गांधींनी देशाला पराधीनतापासून मुक्त केले आहे. आज हे लोक महात्मा गांधींसाठी अपशब्द वापरत आहेत. हे लोक रामाचे भक्त (गांधी) यांचा अपमान करीत आहेत. हे रावणाच्या पोटी जन्मलेले आहेत. चौथरी इतकं बोलून थांबल्या नाही तर त्यांनी बापूंची हत्या करणारा नथुराम गोडसे याचाही उल्लेख केला. ते म्हणाले हे गोडसेचे सरकार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi, Mahatma gandhi

    पुढील बातम्या