मराठी बातम्या /बातम्या /देश /

Precautionary Dose: जाणून घ्या, दुसऱ्या डोसनंतर किती महिन्यांनी घ्यावा लागणार बूस्टर डोस

Precautionary Dose: जाणून घ्या, दुसऱ्या डोसनंतर किती महिन्यांनी घ्यावा लागणार बूस्टर डोस

Booster Dose

Booster Dose

पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले. हे बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्याचंही जाहीर केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 27 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन शनिवारी संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे (Omicron) कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात येणार असल्याचं सांगितलं. हे बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्याचंही जाहीर केलंय. त्याचप्रमाणे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आजार आहे ते देखील 10 जानेवारीपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रीकॉशन डोस(Precaution Dose) घेऊ शकणार आहेत. दरम्यान, एका अहवालात, ज्या लोकांना दुसरा डोस घेऊन 9 महिने पुर्ण झाले आहेत. त्यांनाच प्रीकॉशन डोस(Precaution Dose) मिळू शकतो असे म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील 9 महिन्यांच्या अंतराचा निर्णय पाच वैज्ञानिक अभ्यासांवर आधारित आहे. हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फरीदाबाद यांनी केले. 9 महिन्यांच्या अंतरावर आधारित, फक्त तेच लोक तिसरा डोस घेऊ शकतील, ज्यांना यावर्षी 10 एप्रिलपर्यंत दुसरा डोस देण्यात आला होता. या लोकांमध्ये प्रामुख्याने हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन कामगारांचा समावेश आहे, ज्यांना 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले होते. जे लोक तिसऱ्या डोससाठी पात्र असतील त्यांचा डेटा कोविन अॅपमध्ये आपोआप अपडेट केला जाईल. सरकार या संदर्भात पात्र लोकांची संख्या तयार करत आहे. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते. अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या