मराठी बातम्या /बातम्या /देश /

अरविंद केजरीवालांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ अन् तोडफोड, LIVE VIDEO

अरविंद केजरीवालांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ अन् तोडफोड, LIVE VIDEO

भाजपचे गुंड सीएम केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराजवळचे बॅरिकेड्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. हा हल्ला सुनियोजित कट रचून झाला आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना मारून संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

नवी दिल्ली, 30 मार्च : भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या घराबाहेरील बॅरिकेड्स तोडले. काश्मीर फायल्स चित्रपटाबाबत (Kashmir Files movie) विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने (Bharatiya Janata Paksha Yuva Morcha) निषेध केला. भाजपने केजरीवाल यांच्यावर काश्मिरी हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंग बग्गा आणि खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली आयपी कॉलेज ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत हे आंदोलन करण्यात आलं.

70 आंदोलकांना ताब्यात घेतलं

सकाळी 11.30 च्या सुमारास आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. दुपारी एकच्या सुमारास काही आंदोलकांनी दोन बॅरिकेड्स तोडले. पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी या घटनेला दुजोरा दिला. एका सीसीटीव्ही कॅमेरा आणि बूम बॅरियर आर्मचेही नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. सुमारे 70 जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबमधील पराभवामुळे भाजप नाराज-

पंजाबमधील पराभवामुळे भाजप नाराज असल्याचा आरोप आप नेते राघव चढ्ढा यांनी केला आहे. चढ्ढा म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांच्या उपस्थितीत या गुंडांनी बॅरिकेड्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडले.

भाजपला अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे गुंड सीएम केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराजवळचे बॅरिकेड्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. हा हल्ला सुनियोजित कट रचून झाला आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना मारून संपवण्याचा प्रयत्न करत आहे.

हे वाचा - 3 महिन्यांच्या मुलीची आठवड्यात 10 वेळा विक्री; प्रकरणात जन्मदात्याचाही सहभाग

अरविंद केजरीवाल यांनी माफी मागावी

भाजपवायएम नेते बग्गा आणि सूर्या यांनी आरोप केला आहे की, केजरीवाल यांनी काश्मिरी हिंदूंविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी. बग्गा यांनी ट्विट केले की, "जर काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणे ही समाजविरोधी कृती असेल, तर होय, आम्ही समाजविरोधी आहोत.

First published:

Tags: Arvind kejriwal, BJP