गोव्यात बुकिंग सुरू; या महिन्यापासून परदेशी पर्यटकांचं 'जीवाचं गोवा'

गोव्यात बुकिंग सुरू; या महिन्यापासून परदेशी पर्यटकांचं 'जीवाचं गोवा'

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्यातील पर्यटनावर बंदी आणली होती

  • Share this:

पणजी, 30 जून : गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर चार्टर्ड विमानांच्या बुकिंगची प्रक्रिया सुरु झाली असून ऑक्टोबरपासून परदेशी पर्यटक गोव्यात येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती गोव्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे.

मायकल लोबो यांनी हेही सांगितले की युरोपातील देशांतून आणि रशियन पर्यटकांनी गोव्याला येण्यासाठी बुकिंग सुरु केले आहे. त्यांनी सांगितले की ‘कोरोना युद्धाच्या वर्तमान स्थितीत राज्यातील पर्यटन क्षेत्र पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल. लॉकडाऊनपूर्वी येत असलेल्या पर्यटकांची संख्या पुन्हा गाठण्यासाठी 12 ते 14 महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.’ उत्तरी गोव्याच्या कलंगुटचे आमदार असलेल्या लोबो यांनी हेही सांगितले रेस्टॉरंटप्रमाणे बार उघडण्याची परवानगीही मिळायला हवी.

हे वाचा-भारताविरोधी चिनी पत्रकाराच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रांनी दिलं चोख प्रत्युत्तर

गोव्यातील कोरानाबाधितांची संख्या 1200 पर्यंत पोहोचली

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी सांगितले की, कोरोना व्हायरसचा सामुदायिक प्रादुर्भाव होण्यास राज्यात सुरुवात झाली असून राज्यातील सर्वच विभागातून संक्रमित झालेल्या रुग्णांची प्रकरणे समोर येत आहेत.

हे वाचा-कल्याण-डोंबिवलीतही केली लॉकडाऊनची घोषणा, कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी निर्णय

शुक्रवारी समोर आलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांनंतर, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1198 पर्यंत पोहचला आहे, सद्यस्थितीत यातील 600 हून जास्त जण हे कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एका आरोग्य अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात Coronavirus चे नवे 4878 रुग्ण दाखल झाले. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्यासारखं वाटत असतानाच महाराष्ट्राचा एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 174761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फ्रान्ससारख्या एकेकाळच्या कोरोना हॉटस्पॉटपेक्षा जास्त रुग्ण आज फक्त राज्यातच निघाले आहेत. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे.

First published: June 30, 2020, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading