Home /News /national /

प्रवाशांच्या पडल्या उड्या, रेल्वेची फक्त 3 तासांमध्ये बुक झाली 54,000 हजार तिकीटं

प्रवाशांच्या पडल्या उड्या, रेल्वेची फक्त 3 तासांमध्ये बुक झाली 54,000 हजार तिकीटं

रेल्वेने बंगळुरू, चंदीगड, हावडा, जयपूर, पाटना, प्रयागराज, सिकंदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यांचे दोन क्लस्टरमध्ये विभाजन केले आहे. भारतीय रेल्वेच्या अंदाजानुसार खासगी कंपन्यांमुळे रेल्वेत 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.

रेल्वेने बंगळुरू, चंदीगड, हावडा, जयपूर, पाटना, प्रयागराज, सिकंदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यांचे दोन क्लस्टरमध्ये विभाजन केले आहे. भारतीय रेल्वेच्या अंदाजानुसार खासगी कंपन्यांमुळे रेल्वेत 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.

या रेल्वेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

    मुंबई 11 मे: देशातल्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते रेल्वे सेवा कधी सुरू होणार याकडे. ही सेवा 12 मेपासून सुरू होणार असून त्याचं बुकिंग आज 6 वाजतापासून सुरू झालं. आधी हे बुकींग 4 वाजता सुरू होणार होतं. मात्र वेबसाईटच हँग झाल्याने बुकिंग दोन तास उशीराने सुरू झालं आणि प्रवाशांनी त्यावर उड्याच टाकल्या. 6 वाजता सुरू झालेल्या बुकिंगला एवढा प्रतिसाद होता की रात्री 9 वाजेपर्यंत 54 हजार तिकीटं बुक झालीत. दिल्लीहून कोलकता आणि भुवनेश्वरला जाणाऱ्या गाड्यांचं तिकीट तर अवघ्या 10 मनिटांमध्ये बुक झालं. 4 वाजता मात्र बुकिंग सुरू होताच वेबसाईट बंद पडली त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली. नव्या गाड्या आणि त्यांचे मार्ग याची माहिती अपडेट करणं सुरू असल्याने वेबसाईट(https://www.irctc.co.in/nget/ हँग होत असल्याचं स्पष्टिकरण रेल्वेने दिलं आहे. या रेल्वे प्रवासासाठी तिकीटांचे बुकिंग केवळ ऑनलाइन होणार आहे. IRCTC च्या वेबसाइटवरूनच हे बुकिंग करता येणार आहे. स्टेशनवर तिकीट मिळणार नाही. या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशन वरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू पर्यंत असेल. तसेच चेन्नई, तिरुवनन्तपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या शहरांतूनही रेल्वे सेवा सुरू सुरू होतील. Lockdown 17 मेनंतरही वाढू शकतो, पंतप्रधान आणि मुख्यंत्र्यांची 6 तास चालली बैठक या रेल्वेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टी ध्यानात ठेवल्यास सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे शक्य आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे- -प्रवाशांना दोन तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे. -ज्या प्रवाशांकडे कन्फर्म्ड आणि वैध तिकीट असेल त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. -प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. मास्कसाठी तुम्ही गमछा किंवा स्कार्फचा देखील वापर करू शकता. रेल्वे सुरू होण्याआधी रेल्वे प्रवाशांना स्क्रिनिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल 'मुंबईत राहिलो तर भुकेनं मरू'; रिक्षात संसार जमा करुन चालकांनी धरली गावाची वाट -सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचे पालन काटेरोरपणे करणं आवश्यक आहे -ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नाही आहेत, त्यांनाच रेल्वेमध्ये चढण्यास परवानगी देण्यात आली आहे. -सर्व प्रवाशांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे गरजेचे आहे, अन्यथा ट्रेनमध्ये चढता येणार नाही -ट्रेनमध्ये तुम्हाला रेल्वे विभागाकडून चादर किंवा पांघरूण मिळणार नाही. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शासनाने ही योजना बंद केली आहे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या