बंगळूरू, 19 मे : बंगळूरूमध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेत्याच्या घराबाहेर हा स्फोट झाला आहे. दरम्यान, स्फोट नेमका कशाचा आहे? स्फोट झाला की घडवला याची कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाबाबतचा तपास सुरू करण्यात आला आहे.