मराठी बातम्या /बातम्या /देश /

बैठ जाओ चाचा! अभिनेत्री स्वरा भास्कर असं नेमकं कोणाला म्हणाली?

बैठ जाओ चाचा! अभिनेत्री स्वरा भास्कर असं नेमकं कोणाला म्हणाली?

' तुम्ही जर CAA आणि NRC विरोधात फायद्याचं बोलू शकत नाही तर किमान काहीतरी बरळू नका. '

' तुम्ही जर CAA आणि NRC विरोधात फायद्याचं बोलू शकत नाही तर किमान काहीतरी बरळू नका. '

' तुम्ही जर CAA आणि NRC विरोधात फायद्याचं बोलू शकत नाही तर किमान काहीतरी बरळू नका. '

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 21 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर अनेक विषयांवर सोशल मीडियावर आपली मतं मांडत असते. सध्या सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला अनेक स्तरातून विरोध होत आहे. अभिनेत्री स्वराने कर्नाटकात वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावर ट्विट करत टीका केली आहे.

'वरिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे CAA आणि NRC विरोधात केलं जात असलेल्या आंदोलनाला वेगळं वळण मिळू शकतं. तुम्ही जर CAA आणि NRC विरोधात फायद्याचं बोलू शकत नाही तर किमान काहीतरी बरळू नका. आपण केलेलं वक्तव्य हे बेजबाबदार आणि अत्यंत निंदनीय आहे'. असंही स्वरानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान वारिस पठाण यांनी गुरुवारी कर्नाटकात झालेल्या CAA आणि NRC विरोधातील आंदोलनात वादग्रस्त भाषण केलं होतं. त्या भाषणावर अभिनेत्री स्वरा भास्करनं टीका करत ट्वीट केलं आहे.

हेही वाचा-गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO

काय म्हणाले होते वारिस पठाण

''इट का जवाब पत्थर से' हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल! ,"आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!" अशी चिथावणीखोर भाषा वापरत MIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं. दोन समाजात तेढ निर्माण करू शकतील अशी धक्कादायक विधान पठाण यांच्या भाषणात केली.

(AIMIM)चे नेते वारिस पठाण माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते. कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात अशी वादग्रस्त विधान केलं आहे.

हेही वाचा-सरकारचा मोठा निर्णय, भरतीसाठी महापोर्टल बंद करून नव्या संस्थेची निवड करणार

First published:

Tags: Amit Shah, Asaduddin Owaisi ‏, Caa, MIM, PM narendra modi, Swara bhaskar, Waris pathan.