योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत उदित नारायण यांनी रंगवली मैफल; पाहा VIDEO

योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत उदित नारायण यांनी रंगवली मैफल; पाहा VIDEO

नोएडातील गौतम बुद्धनगर इथं 1000 एकर जागा नियोजित फिल्मसिटीसाठी राखीव असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत सांगितलं.

  • Share this:

लखनऊ, 24 सप्टेेंबर : मुंबई ही भारताची चित्रपटनगरी आहे. सर्व प्रकारचं चित्रीकरण या ठिकाणी होत असतं. मुंबईमधील गोरेगावात सर्वांत मोठी फिल्म सिटी आहे. विविध मालिका आणि चित्रपटांचं या ठिकाणी शूटिंग होत असतं. मात्र आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यात नवीन फिल्मसिटी उभी करणार आहेत. नोएडामध्ये ही नवीन फिल्मसिटी उभी करण्यात येणार असून, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांशी संवाद साधला. या बैठकीत गायक उदित नारायण यांनी योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे स्वागत केलं. त्याचबरोबर 'लगान' चित्रपटातील 'मितवा' हे गाणं देखील त्यांना समर्पित केलं.

नोएडातील गौतम बुद्धनगर इथं 1000 एकर जागा नियोजित फिल्मसिटीसाठी राखीव असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत सांगितलं. या ठिकाणी सुसज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याची योजना असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली. हे ठिकाण नवी दिल्लीपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर असून नियोजित नवीन विमानतळाच्यादेखील अतिशय जवळ आहे. त्याचबरोबर महत्वाचं पर्यटनस्थळ असलेल्या आग्रा या शहरापासूनदेखील जवळ असल्यानं वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. सर्व सोयी सुविधांनीयुक्त आणि अतिशय सुसज्ज अशी फिल्मसिटी उभी करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

हे वाचा-भररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण

या बैठकीला विजयेंद्र प्रसाद, राजू श्रीवास्तव, अशोक पंडित, कैलास खेर, मनोज मुंतासीर, सतीश कौशिक, मनोज जोशी, नितीन देसाई, विनोद बच्चन, प्रज्ञा कुमार, अनुप जलोटा. रवीकिशन, सौंदर्या रजनीकांत, अनुपम खेर, अतुल अग्निहोत्री, परेश रावल इत्यादी मान्यवर देखील उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळं ही बैठक ऑनलाइन झाली.

हे वाचा-VIDEO : ‘सरकार त्यांच्या हातात द्या आणि...’, डब्बेवाल्यांना राज ठाकरेंनी सुनावले

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार 'नियोजित फिल्मसिटीचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया राजू श्रीवास्तव यांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून आम्ही देखील यासाठी प्रयत्न करत असून, बॉलिवूडमधील विविध निर्मात्यांशी याबाबतीत चर्चा देखील केली होती. नवीन फिल्मसिटी तयार झाल्यामुळं स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भोजपुरी सिनेमांसाठी देखील नवीन मंच मिळणार आहे. ही फिल्मसिटी झाली तर स्थानिक अर्थचक्राला गती मिळेल आणि उत्तर प्रदेशातील प्रवासी मजुरांनाही रोजगार मिळेल. त्यामुळं आता उत्तर प्रदेशमध्ये कधी फिल्मसिटी तयार होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असंही राजू श्रीवास्तव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading