धक्कादायक! अवघी 10 वर्षांची असताना या प्रसिद्ध गायिकेचं झालं होतं लैंगिक शोषण

धक्कादायक! अवघी 10 वर्षांची असताना या प्रसिद्ध गायिकेचं झालं होतं लैंगिक शोषण

'दिल दियाँ गल्ला...' फेम प्रसिद्ध गायिका नेहा भसिन (Neha Bhasin) हिने धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी नेहाला लैंगिक शोषणाचा सामना कराला लागला होता.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: 'दिल दियाँ गल्ला...' फेम प्रसिद्ध गायिका नेहा भसिन (Neha Bhasin) हिने धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी नेहाला लैंगिक शोषणाचा सामना कराला लागला होता. IANS ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने याबाबत माहिती दिली. लहानपणी हरिद्वार याठिकाणी गेली असता तिच्यासोबत असा प्रसंग घडला. झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

नेहा भसिनने असे म्हटले आहे की, भारतातील धार्मिक ठिकाणांपैकी एक असणाऱ्या हरिद्वारमध्ये तिच्याबरोबर ही घटना घडली तेव्हा ती 10 वर्षांची होती. ही घटना घडली त्यावेळी तिची आई तिच्यापासून काहीशा अंतरावर उभी होती. त्यानंतर काही वर्षांनी देखील एका हॉलमध्ये नेहाबरोबर लैंगिक शोषणाची घटना घडली होती. नेहा पुढे असं म्हणाली की, 'मला त्या घटना स्पष्टपणे आठवतात. तेव्हा मला ती माझीच चूक आहे असे वाटायचे. आता लोकं सोशल मीडियावर आले आहेत आणि त्यांनी एकमेकांना मानसिक, शारिरीक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. मला हा चेहरा नसणारा दहशतवाद वाटतो.'

(हे वाचा-प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरातून अंमली पदार्थ जप्त, NCBची छापेमारी)

दरम्यान Cyber Bullying संदर्भात नेहाचं एक गाण प्रसिद्ध झालं आहे. याबाबत बोलताना तिने असे देखील म्हटले आहे की,  तिला प्रसिद्ध के-पॉप बँडच्या चाहत्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार या K-Pop बँडची ती फार मोठी चाहती नसल्याची प्रतिक्रिया नेहाने दिल्यानंतर तिला अशाप्रकारच्या धमकी मिळत आहेत. बलात्काराच्या धमकी देखील मिळत आहेत. नेहाने यावेळी असे म्हटले की, 'मी आतापर्यंत सर्वकाही पाहिले आहे. आता मी शांत राहणार नाही. मी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.'

(हे वाचा-प्रभु देवा अडकला लग्नाच्या बेडीत? भाचीबरोबर लग्न करणार असल्याची होती चर्चा...)

नेहाचं 'केहंदे रेहंदे..' (Kehnde rehnde) हे गाणं cyber bullying अर्थात सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याला त्रास देण्याच्या विरोधातील प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये Slut-Shaming, Sexism, cyber bullying याबाबत भाष्य केले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 21, 2020, 12:45 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या