कपूर साहेब, तुम्ही वेड्यांच्या डॉक्टरांना भेटा; जावेद अख्तर संतापले

कपूर साहेब, तुम्ही वेड्यांच्या डॉक्टरांना भेटा; जावेद अख्तर संतापले

बॉलिवूडमधील दोन मोठ्या कलाकारांमध्ये सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जुलै: बॉलिवूडमधील दोन मोठ्या कलाकारांमध्ये सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू झाला आहे. या पैकी एका व्यक्तीने शोले आणि दीवार सारख्या चित्रपटाची पटकथा लिहली आहे. तर दुसऱ्याने बॅडेड क्विन सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जावेद अख्तर आणि शेखर कपूर या दोन कलाकारांमध्ये देश आणि देशप्रेम यावरून वाद सुरू झाला आहे.

जावेद अख्तर आणि शेखर कपूर या दोघांमधील वादाची सुरुवात कपूर यांच्या एका ट्विटवरून झाली. कपूर यांनी देशातील बुद्धिवादी लोकांपासून भीती वाटत असल्याचे म्हटले. इतक नव्हे तर स्वत:ला निर्वासित असल्याचे सांगितले. कपूर यांच्या या विधानावर जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिले.

काय होतं शेखर कपूर यांचं ट्विट...

देशाची फाळणी झाल्यानंतर देखील आपल्याच देशात रिफ्यूजी (निर्वासित) असल्यासारखे वाटतय. आई-वडील मुलांचे आयुष्य चांगले करण्यासाठी सर्व काही पणाला लावतात. पण मला नेहमीच बुद्धिवादी लोकांची भीती वाटते. त्यांनी प्रत्येक वेळी मला कमीपणा दाखवला. माझे चित्रपट पाहिल्यानंतर ते माझी गळाभेट घेतात. पण आज देखील त्यांची गळाभेट मला सापाला गळ्यात घेतल्यासारखी वाटते. मला आज देखील भीती वाटते की मी निर्वासित आहे.

जावेद अख्तर यांनी दिले उत्तर

शेखर कपूर यांच्या ट्विटवर जावेद अख्तर यांनी रविवारी उत्तर दिले. ते म्हणतात, ते कोण बुद्धिमान लोक आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही बोलत आहात. तुम्ही अशा किती बुद्धिवादी लोकांची गळाभेट घेतली आहे आणि त्यापैकी कोण कोण तुम्हाला सापा सारखे वाटले. श्याम बेनेगल, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा? यापैकी कोण. शेखर साहेब तुम्हाला मदतीची गरज आहे. मला सांगण्यास काहीच लाज वाटत नाही की, तुम्हाला वेड्यांच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.

इतकच बोलन ते थांबले नाहीत. शेखर कपूर यांना आणखी एक उत्तर दिले आहे. 'तुम्हाला काय वाटत की तुम्ही येथे निर्वासित आहात. या देशात तुम्हीला बाहेरचे असल्यासारखे वाटते. अशी कोणती जागा आहे जेथे गेल्यानंतर तुम्हाला असे वाटत नाही. पाकिस्तान तर नाही ना? तुमचा हा मेलोड्रामा बंद करा', अशा शब्दात जावेद अख्तर यांनी कपूर यांना सुनावले.

विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी देशातील विविध क्षेत्रातील 49 व्यक्तींनी पंतप्रधान मोदींना पत्र मॉब लिंचिंग संदर्भात पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देत अन्य 62 लोकांनी पत्र लिहले होते. या प्रकरणात शेखर कपूर यांनी मोदींची बाजू घेतली होती. पण आता शेखर कपूर यांचे ट्विट पाहिल्यानंतर जावेध अख्तर यांना धक्काच बसला.

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: July 29, 2019, 4:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading