Loksabha Election 2019: मुन्नाभाई चले गाझियाबाद? देणार भाजपच्या व्ही.के.सिंगांना टक्कर

Loksabha Election 2019: मुन्नाभाई चले गाझियाबाद? देणार भाजपच्या व्ही.के.सिंगांना टक्कर

लोकसभा निवडणुकीतील चर्चेतील नाव म्हणजे बॉलिवूडमधील मुन्नाभाई अर्थात संजय दत्त होय.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च: चित्रपटातून राजकारणात आलेले अनेक कलाकार आहेत. यातील काहींना मोठे यश मिळाले तर काही जण अपयशी ठरले. दक्षिणे तर अनेक स्टार मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील काही स्टार राजकारणाच्या मैदानात दिसणार आहेत. यातील एक चर्चेतील नाव म्हणजे बॉलिवूडमधील मुन्नाभाई अर्थात संजय दत्त होय.

संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेसचे खासदार होते आणि नंतर ते केंद्रात मंत्री देखील झाले. त्यानंतर संजयची बहीण प्रिया दत्त या देखील मुंबईतून लोकसभेवर गेल्या. संजयने देखील राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई बॉम्बस्फोट आणि अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंध असल्याने त्याच्या राजकीय प्रवेशात अडचणी आल्या होत्या. 2009च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने संजय दत्तला उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. मात्र तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने पक्षाला निर्णय बदलावा लागला होता.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला शिक्षा देखील झाली. पण त्यानंतर त्याचा राजकारणातील प्रवेश हा जवळ जवळ बंद झाल्याचे मानले जात होते. पण आता पुन्हा संजयची राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रदर्शित बायोपिकमध्ये संजय दत्तने त्याच्या सर्व चुका मान्य केल्या होत्या. स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी त्याने सामाजिक कार्यात देखील भाग घेतला होता. गेल्या 5 वर्षात संजय दत्तची प्रतिमा बदलली आहे. मुंबईतील लोकांमध्ये संजय दत्तबद्दल फार चांगले मत असेलच असे नाही. पण देशातील अन्य भागात संजयची ओळख ही त्याच्या चित्रपटातून केली जाते.

सपा पुन्हा देणार संधी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्ष संजय दत्तला उमेदवारी देऊ शकतात. जर या मतदारसंघातून संजयला उमेदवारी मिळाली तर त्याचा मुकाबला काँग्रेसचे कुमार विश्वास आणि भाजपचे विद्यमान मंत्री जनरल व्ही.के.सिंह यांच्याशी होऊ शकतो.

तुरुंगातून आल्यानंतर संजयचा बायोपिक वगळता अन्य चित्रपटांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. बॉलिवूडमधील अन्य स्टार सलमान, शाहरुख, आमिर आणि अक्षय यांच्यापेक्षा संजय बराच मागे आहे. त्यामुळेच संजयला दुसरा पर्याय शोधण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. आगामी चित्रपट कलंक बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला तरी त्याचे संपूर्ण श्रेय संजयला मिळणार नाही. संजयकडे सध्या राजकारणात येण्याबरोबरच चित्रपट निर्माता होण्याचा पर्याय त्याच्याकडे आहे.

राजकारणात येण्याचा पर्याय चांगला

संजयसाठी सध्याच्या परिस्थितीत राजकारणात प्रवेश करण्याचा पर्याय योग्य मानला जातो. बायोपिकमुळे संजयची प्रतिमा काही प्रमाणात सुधारली आहे. उत्तर भारतात संजयला चाहता वर्ग मोठा आहे. सपा देखील संजयकडे स्टार उमेदवार म्हणून पाहते. त्यामुळेच संजयसाठी ही निवडणूक फार अवघड जाणार नाही.

VIDEO : पवारांना फक्त भाजपात घेऊ नका, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

First published: March 15, 2019, 6:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading