परेश रावल यांनी केली पाकिस्तानी कलाकाराची थट्टा, ट्विटरवर चांगलंच सुनावलं

परेश रावल यांनी केली पाकिस्तानी कलाकाराची थट्टा, ट्विटरवर चांगलंच सुनावलं

पाकिस्तानी अभिनेता अली जफर यानं सोशल मीडियावर पोस्ट केलं तेव्हा अभिनेते परेश रावल यांनी त्याची चांगलीच थट्टा केलीय.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : सध्या भारत-पाकिस्तानामध्ये तणाव सुरू आहे. यात बाॅलिवूड आणि पाकिस्तानी कलाकारांमध्येही वादावादी सुरू आहे. बाॅलिवूडमध्ये काम करून नाव कमावणारे पाकिस्तानी कलाकार सोशल मीडियावर भारताच्या विरोधात बोलतायत. त्यातच पाकिस्तानी अभिनेता अली जफर यानं सोशल मीडियावर पोस्ट केलं तेव्हा अभिनेते परेश रावल यांनी त्याची चांगलीच थट्टा केलीय.

परेश रावल यांनी या अभिनेत्याला ट्विटरवर चांगलंच सुनावलंय. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाषण दिलं. त्यावर अली जाफर यांनी ट्विट करत म्हटलं, 'What a speech! Pm Imran Khan'. पंतप्रधान इम्रान खान यांनी किती शानदार भाषण केलं.परेश रावलनं अली जाफरला चांगलंच उत्तर दिलं. ते म्हणाले, 'Now speechless!!!' कारण आता इम्रान खान यांना बोलण्यासारखं काहीही उरलं नाहीय.


गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे द्या असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने आज पुरावे सोपवले आणि कारवाई करा असं ठणकावलं. पकिस्तानने पोसलेल्या जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताने याचं पाकिस्तानी कनेक्शन उघड केलं होतं. पुरावे देऊन फायदा नाही अशी भारताची भूमिका होती.

गेल्या दहा दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने पुरावे देण्याची मागणी करत होता. तर या आधी अनेकदा पुरावे दिले काय कारवाई केली अशी भारताची भूमिका होती. मात्र आज दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावण्यात आले आणि त्यांना भारताने सर्व पुरावे दिले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे 'PHOTOS' सोशल मीडियावर व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या