Home /News /national /

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानचं दीर्घ आजारानं निधन

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानचं दीर्घ आजारानं निधन

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    मुंबई, 29 एप्रिल : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खानचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता इरफान खानने लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर मंगळवारी अचनक त्याची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी इरफानच्या आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे आणि प्रकृती ठीक नसल्याने इरफान जयपूरला जाऊ शकले नाहीत. इरफाननं त्यावेळी व्हिडीओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंत्यदर्शन घेतलं होतं. अनेक हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेले इरफान खाननं उपचारादरम्यान आज अखेरचा श्वास घेतला. अंग्रेजी मीडियम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. 13 मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉक़ाउनमुळे 6 एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाच्या अभिनयासाठी त्यांचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. 2018 साली इरफानंला आपल्या या कॅन्सर आजाराविषयी कळलं होतं. त्याने या संदर्भात स्वत: आपल्या फॅन्सना सोशल मीडियावरून माहिती दिली होती. त्यानंतर लंडनमध्ये रुग्णालयात उपचार घेऊन 2019 साली भारतात पुन्हा आले. इरफान खानला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला होता. आपल्या दर्जेदार अभिनयाने भूमिकांना वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी अभिनेता अशी इरफान खानची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारे आज काळाच्या पडद्याआड झाला आहे. बॉलिवूडमधील आणखी एक तारा निखळल्यानं शोककळा पसरली आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या