मराठी बातम्या /बातम्या /देश /

जाहिरातींच्या बाबतीत खिलाडी कुमारला सर्वाधिक पसंती; धोनीचा जलवाही कायम

जाहिरातींच्या बाबतीत खिलाडी कुमारला सर्वाधिक पसंती; धोनीचा जलवाही कायम

टीव्हीवरील जाहिरातींसाठी बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये अक्षयकुमारला सर्वांत जास्त मागणी होती, तर क्रिकेटपटूमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना सर्वात जास्त मागणी होती.

टीव्हीवरील जाहिरातींसाठी बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये अक्षयकुमारला सर्वांत जास्त मागणी होती, तर क्रिकेटपटूमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना सर्वात जास्त मागणी होती.

टीव्हीवरील जाहिरातींसाठी बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये अक्षयकुमारला सर्वांत जास्त मागणी होती, तर क्रिकेटपटूमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना सर्वात जास्त मागणी होती.

  नवी दिल्ली : 2020 या सरत्या वर्षात कोरोनाची (Covid) साथ आणि लॉकडाउनमुळे आर्थिक घडामोडी मर्यादित राहिल्या. तरीही जाहिरातींच्या (Advertisement) बाबतीत मात्र बॉलिवूड स्टार अक्षयकुमार (Akshay Kumar) आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)यांना सर्वाधिक मागणी होती. टीएएम मीडियम रिसर्चच्या (TAM Medium Research Report) अहवालानुसार, टीव्हीवरील जाहिरातींसाठी बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये अक्षयकुमारला सर्वांत जास्त मागणी होती, तर क्रिकेटपटूमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना सर्वात जास्त मागणी होती. या जाहिरातींची धूम - यंदा टीव्हीवर सर्वाधिक वेळा दाखवलेल्या जाहिरातींमध्ये, टॉयलेट सोप्स (Toilet Soaps), ई-कॉमर्स साईट्स (E-Commerce) आणि टूथपेस्टच्या (Toothpaste) जाहिरातींचा समावेश होता. इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या (Hindustan Lever) सर्वाधिक जाहिराती प्रसारित झाल्या. देशात 25 मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर टीव्हीवरील जाहिरातींचे प्रमाण खूप कमी झाले, मात्र अनलॉकनंतर त्यात पुन्हा सुधारणा झाली.

  (वाचा - चुकून एखादं अ‍ॅप विकत घेतलं? Google Play Store वर असं मिळवू शकता रिफंड)

  सरकारने या जाहिरातींवर केला मोठा खर्च - कोरोना साथीच्या संकटावर मात करण्याकरता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने टीव्हीवरील जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरकारने जाहिरातींवर यंदा 16 टक्के अधिक खर्च केला. तर एफएमजीसी कंपन्यांनी (FMGC Sector) सर्वांत जास्त जाहिराती प्रसारित केल्या. यात पहिला क्रमांक हिंदुस्थान लिव्हरचा आहे, तर अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान रेकीट बेन्कीज आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपन्यांनी मिळवले.

  (वाचा - WhatsApp OTP स्कॅम; अशा पद्धतीने हॅक केले जातात अकाउंट्स, अशी घ्या काळजी)

  सर्वाधिक जाहिरातदार कंपन्या - सर्वात जास्त जाहिराती प्रसारित करणाऱ्या कंपन्यांमध्ये कोलगेट, गोदरेज कन्झ्युमर, कॅडबरी इंडिया, विप्रो, अॅमेझॉन आणि अमूल आदी कंपन्यांचा समावेश आहे. या जाहिरातींवर करण्यात आलेल्या खर्च, एकूण जाहिरातींवर करण्यात आलेल्या खर्चापैकी सात टक्के टॉयलेट सोप्सच्या जाहिरातींवर करण्यात आला आहे. चार टक्के खर्च ई-कॉमर्स साईट्सच्या जाहिरातींवर, चार टक्के खर्च टूथपेस्टच्या जाहिरातींवर करण्यात आला आहे. त्यानंतर शॅम्पू, वॉशिंग पावडर, फ्लोअर क्लीनर, मिल्क बेव्हरेज, कार कंपन्या आणि चॉकलेटसच्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Akshay Kumar, MS Dhoni

  पुढील बातम्या