News18 Lokmat

बोईंग 737 नदीत कोसळलं; विमानामध्ये होते 136 प्रवाशी

136 प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बोईंग 737ला अपघात झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 09:43 AM IST

बोईंग 737 नदीत कोसळलं; विमानामध्ये होते 136 प्रवाशी

तालाहासी, 04 मे : बोईंग विमानांच्या मागे लागलेलं अपघातांचं शुल्ककाष्ठ काही थांबताना दिसत नाही. कारण, फ्लोरिडामधील जैक्सनविलेमधील सेंट नदीमध्ये बोईंग 737 विमानं कोसळून अपघातग्रस्त झालं आहे. या विमानामध्ये 136 प्रवाशी होते. विमान लँडिंग करत असताना हा अपघात झाला. अपघातादरम्यान 136 प्रवाशांपैकी सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती जैक्सनविल विमानतळाच्या प्रवक्तानं दिली आहे. शिवाय, जैक्सनविलच्या महापौरांनी देखील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. विमानाला अपघात झाल्यानंतर विमानातील इंधन हे नदीमध्ये मिसळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्युबावरून येत असताना विमानाला हा अपघात झाला. तसंच अपघातानंतर विमान बुडालं नसून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.Loading...
केवळ 1 रूपयामध्ये खरेदी करा सोनं; अक्षय तृतीयासाठी जबरदस्त ऑफर

157 प्रवाशांचा झाला होता मृत्यू

दरम्यान, यापूर्वी 10 मार्च रोजी इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 क्रॅश झालं होतं. यामध्ये 157 प्रवाशी होते. अपघातादरम्यान सर्व म्हणजेच 157 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये भारतीय, अमेरिकन आणि चीनच्या प्रवाशांचा देखील समावेश होता. इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 आदिस आबाबा येथील केनियाची राजधानी नौरोबी येथे जात होतं. यावेळी विमान क्रॅश झालं. 149 प्रवासी आणि 8 क्रु मेंबर या विमानातून प्रवास करत होते. सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात झाला होता. त्यातील सर्व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

बोईंग विमानांच्या वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता कंपनीनं देखील हे सारं प्रकरण गांभीर्यानं घेतलं होतं. दरम्यान, फ्लोरिडामधील अपघात नेमका कशामुळं झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.


VIDEO: सापांचं अनोखं प्रेम, सर्पमिलनाचा दुर्मीळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2019 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...