भाजपच्या बूथ कार्यालयात मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की आत्महत्या?

भाजपच्या बूथ कार्यालयात मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की आत्महत्या?

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे गुरुवारी सकाळी भाजपच्या बुथ कार्यालयात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

कोलकाता, 04 एप्रिल: पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे गुरुवारी सकाळी भाजपच्या बुथ कार्यालयात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या बूथ कार्यालयात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

सिलीगुडी येथील भाजपच्या बूथ कार्यालयात एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अर्थात या व्यक्तीची हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. लोकसभा निवडणुकाचा प्रचार सुरु असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.


SPECIAL REPORT : हेच 'ते' महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे बेताल नेते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 10:08 AM IST

ताज्या बातम्या