हैदराबाद Encounter :आरोपींच्या मृतदेहांवर शुक्रवारपर्यंत अंत्यसंस्कार नाही, हायकोर्टाचा आदेश

हैदराबाद Encounter :आरोपींच्या मृतदेहांवर शुक्रवारपर्यंत अंत्यसंस्कार नाही, हायकोर्टाचा आदेश

सामान्य लोकांनी पोलिसांचं कौतुक केलंय तर अनेक नेते आणि संघटनांनी संशय व्यक्त केलाय. प्रकरण कोर्टात गेल्याने पोलिसांना आता सर्व शंकांचं उत्तर कोर्टात द्यावं लागणार आहे.

  • Share this:

हैदराबाद 09 डिसेंबर : देशभर गाजत असलेल्या हैदराबात एन्काउंटर प्रकरणावर तेलंगणा हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी हायकोर्टानं आदेश देत आरोपींच्या मृतदेहांवर शुक्रवारपर्यंत अंत्यसंस्कार करू नका, ते मृतदेह जतन करून ठेवा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर आता या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे. काही सामाजिक संघटनांनी याबाबत तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी सर्व आरोपींचं एन्काउंटर केल्यानंतर देशभर प्रचंड वादळ निर्माण झाले होतं. सामान्य लोकांनी पोलिसांचं कौतुक केलंय तर अनेक नेते आणि संघटनांनी संशय व्यक्त केलाय. प्रकरण कोर्टात गेल्याने पोलिसांना आता सर्व शंकांचं उत्तर कोर्टात द्यावं लागणार आहे.

पोर्नोग्राफी, सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार'

चारही आरोपींचं एन्काऊंटर

हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद इथे 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करून चौघांनी ठार मारलं.

पण त्याच वेळी या चार मृत आरोपींपैकी एकाच्या पत्नीने अजब दावा केला आहे. आपल्या पतीचा दफनविधी करण्यास नकार देत तिने एन्काउंटरविषयी नाराजी व्यक्त केली. "किती लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची अशी शिक्षा मिळते, असा सवाल करत तिने म्हटलंय की, "या आरोपींना ज्या पद्धतीने गोळी मारण्यात आली, तशी जेलमध्ये असलेल्या अन्य आरोपींनाही मारण्यात यावी. तोपर्यंत आम्ही शवाचा दफनविधी करणार नाही."

नाराज खडसे दिल्लीला रवाना, छगन भुजबळांनीही दिली प्रतिक्रिया

तेलंगणच्या नारायणपेट जिल्ह्यातल्या आपल्या गावात आरोपी  चेन्ना केशवुलूची पत्नी इतर काही गावकऱ्यांसमवेत धरणे धरून बसली आहे. ती गर्भवती आहे. आपल्या पतीवर अन्याय झाल्याचा तिने आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 03:16 PM IST

ताज्या बातम्या