मराठी बातम्या /बातम्या /देश /

आसाममध्ये भीषण अपघात, 100 प्रवासी असलेल्या दोन बोटींची टक्कर, पाहा VIDEO

आसाममध्ये भीषण अपघात, 100 प्रवासी असलेल्या दोन बोटींची टक्कर, पाहा VIDEO

आसाममध्ये (Assam) दोन बोटींची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) अनेकजण बेपत्ता (Missing) झाले आहेत.

आसाममध्ये (Assam) दोन बोटींची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) अनेकजण बेपत्ता (Missing) झाले आहेत.

आसाममध्ये (Assam) दोन बोटींची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) अनेकजण बेपत्ता (Missing) झाले आहेत.

  • Published by:  desk news

दिसपूर, 8 सप्टेंबर : आसाममध्ये (Assam) दोन बोटींची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) अनेकजण बेपत्ता (Missing) झाले आहेत. सुमारे 100 प्रवाशांना (100 commuters) घेऊन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन बोटींची आमनेसामने जोरदार टक्कर झाली. या अपघातात बोटीतील नागरिकांना इतका जोरदार धक्का बसला की त्यातील बहुतांश नागरिक उडून पाण्यात पडले. सध्या बोटीतील अनेक नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत हा अपघात झाला आहे. आसामच्या जोरहट जिल्ह्यातील नीमतीघाटमध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे. एक बोट माजुलीकडून निमतीघाटकडे चालली होती, तर दुसरी बोट निमतीघाटकडून माजुलीकडे येत होती. या दरम्यान नीमतीघाटच्या जवळ असताना या दोन्ही बोटी एकमेकांना धडकल्या आणि प्रवासी नदीत पडले.

सध्या पावसाळा असल्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आलेला आहे. अगोदरच विस्तीर्ण असणारं ब्रह्मपुत्रेचं पात्र बोटींच्या प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. दररोज हजारो प्रवासी बोटीने प्रवास करत असतात. अपघात झालेल्या दोन बोटींमध्ये मिळून जवळपास 100 प्रवासी होते, अशी माहिती मिळत आहे. त्यात काही ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश होता. त्यातील किती जणांना पोहता येत होतं, याची कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी या अपघाताबबात दुःख व्यक्त केलं असून तातडीनं शोधकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीनं शोधकार्य सुरू करण्यात आलं असून ब्रह्मपुत्रेच्या पात्रात बोटींच्या साहाय्यानं नागरिकांचा शोध घेतला जात आहे. अऩेक नागरिक हे पोहत राहिल्यामुळे त्यांचा जीव वाचणं शक्य आहे, मात्र ज्या नागरिकांना पोहता येत नाही, त्यांच्या जिवाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे वाचा - अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्याची माहिती द्या आणि कमवा 50 लाख डॉलर: अमेरिका

अद्यापही नेमके किती नागरिक गायब आहेत आणि किती जणांना वाचवण्यात यश आलं आहे, याची कुठलीही माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

First published: