Home /News /national /

Board Exams 2021: भारतात कोरोनाचा उद्रेक, 7 राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Board Exams 2021: भारतात कोरोनाचा उद्रेक, 7 राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Board exam updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील सात राज्यांनी आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

    मुंबई, 14 एप्रिल: कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे सीबीएसई बोर्डाने आपल्या दहावीच्या परीक्षा रद्द (CBSE cancelled class 10 exam) केल्या आहेत. तर 12वीच्या परीक्षा (Class 12 exams) पुढे ढकलल्या आहेत. 12वीच्या परीक्षा कधी घ्यायच्या यासंदर्भातील निर्णय 1 जून नंतर घेण्यात येणार आहे. केवळ सीबीएसईच्याच नाही तर देशभरातील एकूण सात राज्यातील शिक्षण मंडळांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. पंजाब बोर्ड पंजाबमधील बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेणारं पंजाब हे पहिलं राज्य ठरलं आहे. पंजाबमधील 12वीच्या परीक्षा 20 एप्रिल रोजी सुरू होणार होत्या तर दहावीच्या परीक्षा 4 मे पासून सुरू होणार आहेत मात्र, या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. महाराष्ट्र बोर्ड राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, हित लक्षात घेऊन इयत्ता 10वी आणि 12वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराश्ट्र सरकार आणि शिक्षण मंडळाने घेतला आहे. हिमाचल प्रदेश कोरोनाच्या संकटामुळे हिमाचल प्रदेश सरकारने हिमाचल शैक्षणिक बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 17 मे पर्यंत स्थगित करण्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भात शिक्षण विभागानेही आदेश प्रसिद्ध केले आहेत. हिमाचल प्रदेशात 13 एप्रिल पासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणाऱ होत्या. मात्र, दोन दिवसांपूर्वीच बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर करण्यात आलं. वाचा : CBSE Board Exams 2021: मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे राजस्थान बोर्ड कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक मोठा निर्णय घेत राजस्थान बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याचसोबत 8वीच्या विद्यार्थ्यांना 9वीत, 9वीच्या विद्यार्थ्यांना दहावीत आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना 12वीत प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश बोर्ड मध्य प्रदेशातील बोर्डाच्या परीक्षा 30 एप्रिल पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. छत्तीसगड बोर्ड छत्तीसगडमध्ये सुद्घा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 15 एप्रिल पासून सुरू होणार होत्या. आता परीक्षेची पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. तर 12वीच्या परीक्षा आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार म्हणजेच 3 मे रोजी घेण्यात येणार आहेत. तमिळनाडू बोर्ड तमिळनाडू मधील शिक्षण मंडळाने आपल्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 9वी आणि 11वी प्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रमोट करण्यात येणार आहे. मात्र, 12वीच्या परीक्षा तीन मे पासून सुरू होणार आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Board Exam, Coronavirus, Maharashtra

    पुढील बातम्या