जीवघेणा ब्ल्यू व्हेल गेम हटवा, केंद्राचे गुगल-फेसबुकला आदेश

जीवघेणा ब्ल्यू व्हेल गेम हटवा, केंद्राचे गुगल-फेसबुकला आदेश

मुलांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या ब्लू व्हेल गेमवर केंद्र सरकारने अखेर बंदी घातलीये

  • Share this:

15 आॅगस्ट : मुलांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या ब्लू व्हेल गेमवर केंद्र सरकारने अखेर बंदी घातलीये. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लू व्हेल गेम हटवण्याचे गुगल, फेसबुकला आदेश दिले आहे.

जगभरात आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने हाहाकार उडवलाय. भारतात या गेमपायी दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्यात. मुंबईत 14 वर्षांच्या मनप्रीत नावाच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या 10वीत शिकणाऱ्या अनकन डे याने गेमचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आत्महत्या केली होती. एवढंच नाहीतर मध्यमप्रदेशमध्येही एका अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी ब्लू व्हेल गेमवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत आता बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. ब्लू व्हेल आणि यासारख्या इतर जीवघेण्या गेमला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरून हटवण्याची सुचना यात दिलीये. यात गुगल, फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम, मायक्रोसाॅफ्ट,याहू इंडिया यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तसंच या आदेशानंतरही जर कुणी खेल सुरू ठेवत असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असं आवाहनही करण्यात आलंय.

First published: August 15, 2017, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading