मराठी बातम्या /बातम्या /देश /

विरोधकांच्या मिशन 2024 ला धक्का? शरद पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला ममतांचा विरोध!

विरोधकांच्या मिशन 2024 ला धक्का? शरद पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला ममतांचा विरोध!

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे, पण या निवडणुकीआधी विरोधकांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 22 जुलै : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे, पण या निवडणुकीआधी विरोधकांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alwa) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुख्य म्हणजे मार्गारेट अल्वा यांचं नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केलं, पण आता या नावाला ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) टीएमसीने विरोध दर्शवला आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टीएमसी मतदान करणार नाही. टीएमसीच्या या निर्णयाचा अप्रत्यक्ष फायदा भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांना होणार आहे. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) ये सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.

'एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण राज्यपाल असताना धनखड यांनी सरकारसोबत समन्वय ठेवला नाही. तर अल्वा यांच्या नावाची चर्चा न करताच घोषणा करण्यात आली. पक्षाच्या खासदारांची आज बैठक झाली, यानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेण्यात आला,' असं टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

विरोधकांच्या एकीला धक्का

शरद पवारांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करताना 17 विरोधी पक्षांचा अल्वा यांना पाठिंबा आहे, तसंच तृणमूल आणि आम आदमी पक्षामुळे ही संख्या 19 होईल असा विश्वास व्यक्तय केला. पण आता तृणमूल काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे.

मागच्या वर्षी 2024 लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकीसाठी शरद पवारांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईमध्ये आल्या होत्या. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्येही विरोधकांची एकी दिसली होती. एवढच नाही तर ममता बॅनर्जींसह विरोधकांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, पण पवारांनी याला नकार दिल्यामुळे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली.

2024 मध्ये विरोधक एकत्र येऊन भाजपला टक्कर देऊ शकतात का? याची रंगीत तालिम म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनेक राज्यांमध्ये विरोधकांकडून द्रौपदी मुर्मू यांना मतदान झालं, तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधीच ममता बॅनर्जींनी वेगळी भूमिका घेतली, त्यामुळे मिशन 2024 मध्येही विरोधक विखुरले तर भाजपला टक्कर कशी देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: Mamata banerjee, शरद पवार. sharad pawar